Shocking | शाहिद कपूरला सोशल मीडियावर काम मागण्याची वेळ, या अवस्थेला मीरा राजपूत जबाबदार?
‘कबीर सिंह’ (Kabir Singh) चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीद कपूर (Shahid Kapoor)चे स्टार झळकले आहेत.
मुंबई : ‘कबीर सिंह’ (Kabir Singh) चित्रपट हिट झाल्यानंतर शाहिद कपूर (Shahid Kapoor)चे स्टार झळकले आहेत. अनेक बड्या चित्रपटाच्या ऑफर येत आहेत. बॉलिवूडशी संबंधित प्रत्येक दिग्दर्शक, निर्माता शाहिदला आपल्या चित्रपटात घेण्यास इच्छुक आहे. शाहिद आता कुठलाही चित्रपट साइन करण्याच्या अगोदर चित्रपटाच्या कथेवर जास्त लक्ष देतो. गेल्या वर्षी शाहिद जर्सी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि चाहते त्यांच्या आगामी जर्सी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या सर्वांमध्ये एक व्यक्ती अशी आहे की, त्याच्या कुठल्याच चित्रपटावर खुश नाही.(Shahid Kapoor’s post goes viral on social media)
त्या व्यक्तीला शाहिदकडून अजून वेगळ्या चित्रपटाच्या अपेक्षा आहेत. पण तुम्हाला प्रश्न पडला असेलना ही नेमकी व्यक्ती कोण आहे जी शाहिदच्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांवर खुश नसून तिला अजून वेगळ्या चित्रपटांच्या अपेक्षा आहेत, तर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शाहिदचे पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) आहे. बसलाना आश्चर्याचा धक्का होय, मीरा शाहिदच्या या चित्रपटांवर खुश नसून तिला आणखीन वेगळ्या चित्रपटाच्या अपेक्षा शाहिदकडून असल्याचा खुलासा खुद्द शाहिदनेच सोशल मीडियावर केला आहे.
मीराला असे वाटते की, शाहिद कपूरने डान्स चित्रपटात काम करावे. नुकताच शाहिदने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केले आहे ज्यात त्याने लिहिले आहे की “माझ्या पत्नीने मला विचारले आहे की, कोणत्या डान्स चित्रपट का काम करत नाही. तर अशा प्रकारचा चित्रपट असेतर कृपया मला त्यामध्ये संधी द्या जेणे करून मी माझ्या पत्नीला खुश करू शकेन शाहिदची ही पोस्ट चाहत्यांना खूपच आवडली आहे.
शशांक खेतान निर्देशित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘योद्धा’ चित्रपटात शाहिद कपूर दिसणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. असे म्हटले जात आहे की, स्वत: शाहिद कपूरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदसोबत दिशा पाटनी या चित्रपटात दिसणार होती. मीडिया रिपोर्टनुसार शाहिद कपूर जर्सीचे शूटिंग पूर्ण होताच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होता, पण आता शाहिदनेच चित्रपटास नकार दिला आहे.
संबंधित बातम्या :
नेहा कक्करने आदित्यला विचारली लव्हस्टोरी, भर शोमध्ये केला प्रेमाचा खुलासा
Ekkis | वरुण धवन बनणार आर्मी ऑफिसर, ‘अंदाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन साकारणार ड्रीम प्रोजेक्ट!
(Shahid Kapoor’s post goes viral on social media)