21 वर्षाचा ‘सुहाना’ सफर, शाहरुखच्या कन्येकडून बोल्ड फोटो शेअर; ‘या’ अभिनेत्रीची खास कमेंट

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान काल शनिवारी 21 वर्षाची झाली. (Shahrukh Khan daughter Suhana Khan Share Bold And glamorous photos)

21 वर्षाचा 'सुहाना' सफर, शाहरुखच्या कन्येकडून बोल्ड फोटो शेअर; 'या' अभिनेत्रीची खास कमेंट
Suhana khan
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 3:13 PM

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान काल शनिवारी 21 वर्षाची झाली. साक्षात किंग खानची कन्या असलेल्या सुहानाचा हा 21 वर्षाचा सफर सुहाना राहिला नसेल तर नवलच. सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या सुहानाची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तिच्या प्रत्येक पोस्ट, फोटोला चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत असतो. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. (Shahrukh Khan daughter Suhana Khan Share Bold And glamorous photos)

सुहानाने आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पेस्टर ग्रीन कलरचा बोल्ड ड्रेस घातला आहे. हा फोटो शेअर करतानाच तिने त्यावर केवळ ’21’ असं लिहिलं आहे. यातून तिला मी 21वं पूर्ण केलं आहे, असं सांगायचं आहे. त्यासोबत तिने एक हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. सुहानाच्या या पोस्टला 2 लाख यूजर्सने लाईकही केलं आहे. या फोटोवर तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदा यांनी कमेंट केली आहे.

टिंकरबेल

‘टिंकरबेल’, अशी कमेंट अनन्याने केली आहे. टिंकरबेल ही एक राजकुमारी आहे. त्यामुळे अनन्याने सुहानाला टिंकरबेल संबोधलं आहे. तर नव्याने सुहानाच्या पोस्टवर हार्टवाली इमोजी शेअर केली आहे.

डान्सचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सुहानाच्या वाढदिवसानिमित्त तिची आई गौरी खानने एक स्पेशल पोस्ट शेअर केली होती. ‘हॅपी बर्थडे. तुझ्यावर आज, उद्या आणि कायमच खूप खूप प्रेमाचा वर्षाव राहील,’ असं गौरी खानने म्हटलं आहे. तर सुहानाची बेस्ट फ्रेंड शनाया कपूरनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत या दोघीही ‘ये मेरा दिल जाने…’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. त्यावर शनायाने एक पोस्टही लिहिली आहे. ‘हॅपी बर्थडे माझ्या सू… आपण सदैव सोबत डान्स करत राहू’, असं शनायाने म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर होत आहे.

आधी शिक्षण नंतर अभिनय

सुहानाने न्यूयॉर्कमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. अॅक्टिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना न्यूयॉर्कमधून तिचे बोल्ड फोटो इन्स्टावर शेअर करत असते. सुहानाला अभिनयाची आवड आहे. मात्र, आधी ती शिक्षण पूर्ण करेल. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये येईल, असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिची एक शॉर्ट फिल्म नुकतीच रिलीज झाली होती. त्यातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. (Shahrukh Khan daughter Suhana Khan Share Bold And glamorous photos)

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

संबंधित बातम्या:

PHOTO | लीक झालेल्या न्यूड सीनने त्रासलेली राधिका आपटे, व्हिडीओ व्हायरल होताच घरातून बाहेर पडणे झाले होते कठीण!

अंडरवर्ल्डशी थेट कनेक्शन, एका कॉलवर मिळायचे चित्रपट, आता अध्यात्माच्या मार्गाला लागलीय ममता कुलकर्णी!

PHOTO | रायमा सेनने ‘टॉपलेस’ फोटोशूट शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा, बोल्डनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!

(Shahrukh Khan daughter Suhana Khan Share Bold And glamorous photos)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.