ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, लाडक्या अभिनेत्याला पाहून चाहते झाले भावूक!
दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज (4 सप्टेंबर) ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) या त्यांच्या आगामी चित्रपटाचे 2 पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. या 2 पोस्टर्सपैकी एकामध्ये ऋषी कपूर आणि दुसऱ्यामध्ये परेश रावल दिसत आहेत.
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज (4 सप्टेंबर) ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) या त्यांच्या आगामी चित्रपटाचे 2 पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. या 2 पोस्टर्सपैकी एकामध्ये ऋषी कपूर आणि दुसऱ्यामध्ये परेश रावल दिसत आहेत. ही पोस्टर्स शेअर करताना मेकर्सने लिहिले, ‘हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात नामांकित अभिनेते ऋषी कपूर यांचा एक विशेष चित्रपट ‘शर्माजी नमकीन’चे पोस्टर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो, ज्यांचे अनोखे काम आणि एक अद्भुत कारकीर्द नेहमीच आमच्याकडून जपली जाईल.’
त्यांनी पुढे लिहिले की, ‘त्यांचे प्रेम, आदर आणि स्मृतींचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना भेट म्हणून, त्याच्या शेवटच्या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. परेश रावल यांचे खूप आभार, ज्यांनी ऋषीजींनी साकारलेले समान पात्र साकारण्याचे संवेदनशील पाऊल उचलण्याचे मान्य करून चित्रपट पूर्ण केला. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मॅकगफिन पिक्चर्स निर्मित, नवोदित हितेश भाटिया दिग्दर्शित, हा चित्रपट 60वर्षांच्या एका प्रेमळ व्यक्तीची कथा सांगतो.’
पाहा पोस्टर :
View this post on Instagram
एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि मॅकगफिन पिक्चर्स निर्मित, चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर, हनी त्रेहान, अभिषेक चौबे आणि कासिम जगमगिया यांनी सहनिर्मित केली आहे.
नीतू कपूरची पोस्ट
View this post on Instagram
या प्रसंगी ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी ऋषीसाठी एक खास पोस्ट केली आहे. ऋषींसोबत एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘न्यूयॉर्कमधील त्या कठीण दिवसांमध्ये मी ऋषी कपूर यांच्याकडून खूप काही शिकले. त्यांचा ब्लड काऊंट वाढत असताना आम्ही ते दिवस कसे साजरे करायचो, आम्ही खरेदीला जायचो आणि खूप आनंदाने हसायचो. कधीकधी जेव्हा त्याला अशक्त वाटत असे, तेव्हा आम्ही घरी बसून टीव्ही बघायचो आणि मस्त जेवणाची ऑर्डर करायचो आणि एकत्र अनेक क्षण एकत्र साजरा करायचो. त्याने मला आशा ठेवायला आणि बलवान व्हायला शिकवले.’
पाहा नीतू कपूरची पोस्ट
नीतूने पुढे लिहिले, ‘दररोज येण्याऱ्या दिवसाचे मूल्य जपा. आज आपण सर्वजण त्याला मिस करत आहोत. मी त्याची कल्पना करू शकतो की, त्याने आपला 69वा वाढदिवस कसा साजरा केला असता… मला माहीत आहे की, आता जिथे आहे तिथे त्याच्या कुटुंबासोबत हा दिवस साजरा करत असावा. कपूर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
हेही वाचा :
‘मला नट म्हणून घडवण्यात शाहीर साबळेंचा मोठा वाटा’, अभिनेते भरत जाधव यांनी शेअर केल्या आठवणी!