असे काय घडले होते की, चक्क शशी कपूर यांनी दिग्दर्शकाला सांगितले होते अमिताभ बच्चन यांचा सीन कट करण्यास, वाचा

जेंव्हा बाॅलिवूडमध्ये कामाच्या शोधामध्ये अमिताभ बच्चन होते, त्यावेळी शशी कपूर यांनी बाॅलिवूडमध्ये आपले करिअर सेट केले होते. त्यावेळी शशी कपूर यांच्याकडे अनेक चित्रपट होते.

असे काय घडले होते की, चक्क शशी कपूर यांनी दिग्दर्शकाला सांगितले होते अमिताभ बच्चन यांचा सीन कट करण्यास, वाचा
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 9:58 PM

मुंबई : अमिताभ बच्चन आणि शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे चित्रपटही हीट ठरले. सर्वांनाच माहिती आहे की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शशी कपूर हे खूप चांगले मित्र होते. इतकेच नाही तर शूटिंगच्या वेळी शशी कपूर कायमच अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन जायचे. कारण चित्रपटाच्या सेटवर सतत राहिल्यास अमिताभ बच्चन यांना नक्कीच काम करण्याची सुवर्णसंधी मिळेल असे कायमच शशी कपूर यांना वाटायचे. शशी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांची अनेक चित्रपट (Movie) निर्मात्यांसोबत ओळख करू दिली होती. मात्र, एक काळ असा आला होती की, चक्क शशी कपूर यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला सांगून अमिताभ बच्चन यांचे सीन चित्रपटामधून काढून टाकण्यास सांगितले होते.

जेंव्हा बाॅलिवूडमध्ये कामाच्या शोधामध्ये अमिताभ बच्चन होते, त्यावेळी शशी कपूर यांनी बाॅलिवूडमध्ये आपले करिअर सेट केले होते. त्यावेळी शशी कपूर यांच्याकडे अनेक चित्रपट होते. काम मिळत नसल्याने चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन हे शशी कपूर यांच्या सोबत जायचे.

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांनी दीवार, कभी कभी, सिलसिला यासारख्या चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. एकदा शशी कपूर हे त्यांच्या चित्रपटाचे सीन शूट करत होते, त्यावेळी शूटिंगसाठी काही माणसांची गर्दी लागणार होती.

या गर्दीमध्ये अमिताभ बच्चन देखील सहभागी झाले. त्याचे शूटिंग देखील झाले. मात्र, शशी कपूर यांना गर्दीमध्ये अमिताभ बच्चन दिसले. यानंतर शशी कपूर याने अशाप्रकारेचे काम नाही करायचे हे अमिताभ बच्चन यांना बजावून सांगितले.

अमिताभ बच्चन यांनी शशी कपूर यांना सांगतात की, मला पैशांची गरज असल्याने मी हे करण्याचा निर्णय घेतला. शशी कपूर हे अमिताभ बच्चन यांना म्हणाले की, तुला पैशांची गरज होती तर मला मागायचे ना…

बऱ्याच वेळा मुंबईमध्ये आल्यावर असे होते, पण तू असे रोल यानंतर करायचे नाहीत. बाॅलिवूडमध्ये करिअर करताना थोडा वेळ लागतो, असेही शशी कपूर हे आमिताभ बच्चन यांना म्हटले होते.

मुंबईमध्ये हिरो बनण्यास आला आहेस तर असे काम पुन्हा नको करू…करिअरच्या सुरूवातीला असे छोटे रोल करणे करिअरसाठी ठीक नाहीये… तुला कधीही पैसे लागले तर मला सांग…