Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांनी केला खळबळजनक खुलासा, चाहते हैराण, थेट म्हणाले माझ्या पत्नीची…

शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच अरबाज खान याच्या शोमध्ये मोठा खुलासा केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आता यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांनी केला खळबळजनक खुलासा, चाहते हैराण, थेट म्हणाले माझ्या पत्नीची...
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:57 PM

मुंबई : नुकताच शत्रुघ्न सिन्हा हे अरबाज खान याच्या ‘द इनव्हिन्सिबल’ शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यामधील अनेक किस्से सांगितले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी पत्नी पूनम हिच्यासोबत पहिली भेट कशी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाली हे देखील सांगितले. शोमध्ये त्यांनी चित्रपटातील अनेक मजेशीर किस्से देखील सांगितले आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी अर्थात बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लवकरच अक्षय कुमार याच्यासोबत एका बिग बजेटच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे. सोनाक्षी सिन्हा हिने यापूर्वी अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

अरबाज खान याच्या शोमध्ये बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आयुष्यामध्ये केलेल्या चुकांबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी मान्य केले की, आपण पत्नी पूनम सिन्हा हिला धोका दिला आणि तिच्यापासून वेगळे होण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना त्यांची चूक काही दिवसांनंतर लक्षात आली.

विशेष म्हणजे पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे पहिल्या भेटीच्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर लग्न झाले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मला माहिती नव्हते की, माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी अभिनेता होईल. पुढे काय होणार याची कल्पना मला मुळीच नव्हती किंवा मी त्याचा विचार केला नव्हता.

आम्ही बोलणे बंद केले आणि तो माझा निर्णय होता. विशेष म्हणजे हे त्यावेळी झाले होते, ज्यावेळी माझ्या आयुष्यात खूप काही घडत होते…मी त्याबद्दल काही बोलणार नाहीये….कारण ती माझी चूक होती. मी फक्त पूनम आणि माझ्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारणे शोधत होतो आणि नात्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होतो.

मी एक दिवस पूनम हिला म्हणालो की, तू माझ्यासाठी खूप चांगली आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मुळात ही पूर्णपणे माझी चूक होती, मी फक्त स्टारडममध्ये अडकलो होतो. मला अगोदर वाटत होते की, कोणतीही महिला माझ्यामध्ये रस घेणार नाही. मात्र, काही दिवसांमध्ये संपूर्ण परिस्थिती बदलत गेली आणि मी माझे नियंत्रण गमावले.

मी तिला एक प्रकारचा घटस्फोट दिला. इतकेच नाहीतर मी तिच्यासोबतचे सर्व संपर्क देखील तोडले. मला काही दिवसांनी कळाले की, पूनम मला शोधत आहे. इतकेच नाहीतर मी तिच्यासोबत असलेल्या नात्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती माझ्या कर्मचाऱ्यांना माझी काळजी घेण्याचे सांगत होती, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या या मोठ्या खुलाशाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.