शहनाज गिल आणि गुरु रंधावा यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय? सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांचा चढला पारा
इतकेच नाही तर सलमान खानच्या चित्रपटात शहनाज महत्वाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे.
मुंबई : बिग बाॅस फेम शहनाज गिल हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. इतकेच नाही तर सलमान खानच्या चित्रपटात शहनाज महत्वाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. ही अशी एक पहिली अभिनेत्री असेल की, बिग बाॅसच्या घरात जाऊन तिने एक वेगळी ओळख निर्माणे केली आणि थेट भाईजानच्या चित्रपटात काम करत आहे. शहनाज गिल ही मुळची पंजाबची आहे. बिग बाॅसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
बिग बाॅस 13 मध्ये शहनाज सहभागी झाली होती. त्यानंतर काही काळ शहनाज सिद्धार्थसोबतच मुंबईत राहत होती. अचानकपणे सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतल्यानंतर शहनाज पुर्णपणे तुटली होती. इतकेच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्ये सिद्धार्थचे नाव निघाल्यावर शहनाज रडण्यापासून स्वत: ला रोखू शकत नव्हती.
View this post on Instagram
आजही शहनाज सोशल मीडियावर सिद्धार्थच्या आठवणीमधील अनेक फोटो शेअर करते. आज शहनाजचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. शहनाज आणि सिद्धार्थ लवकरच लग्न देखील करणार होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. गेल्या काही दिवसांपासून शहनाजचे नाव पंजाबी सिंगर गुरु रंधावा याच्यासोबत जोडले जात आहे.
शहनाज आणि गुरु रंधावा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये शहनाज आणि गुरु रंधावा मस्त डान्स करताना दिसत आहेत. हे दोघे कायमचसोबत स्पाॅट देखील होतात. मात्र, सिद्धार्थच्या चाहत्यांना हा व्हिडीओ अजिबात आवडलेला दिसत नाहीये. सिद्धार्थचे चाहते यावर संताप व्यक्त करत अनेक कमेंट करत आहेत.