Salman Eid : कधी Kiss तर कधी आलिंगन, अर्पिता खानच्या ईद पार्टीत सलमान-शहनाजचीच चर्चा

सलमानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातून शहनाज (Shehnaaz Gill) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समजतंय. याबाबत सलमान किंवा शहनाजने अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील मैत्री सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

Salman Eid : कधी Kiss तर कधी आलिंगन, अर्पिता खानच्या ईद पार्टीत सलमान-शहनाजचीच चर्चा
Shehnaaz Gill and Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 9:45 AM

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमानचा (Salman Khan) हात ज्या कलाकाराच्या डोक्यावर असतो, त्याचं नशीब पालटण्यास वेळ लागत नाही असं म्हटलं जातं. सलमानने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना लाँच केलंय. त्यात आता ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचाही (Shehnaaz Gill) समावेश झाला आहे. सलमानच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समजतंय. याबाबत सलमान किंवा शहनाजने अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील मैत्री सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. आधी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शहनाजने सलमानची भेट घेतली आणि त्यानंतर आता सलमानची बहीण अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईद पार्टीतही (Eid Party) तिला पाहिलं गेलं. या ईद पार्टीतील सलमान आणि शहनाजचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अर्पिता खानच्या ईद पार्टीला बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार उपस्थित होते. मात्र या सर्वांत पंजाबची कतरिना म्हणजेच शहनाजनेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अर्पिताच्या ईद पार्टीला उपस्थित राहणं म्हणजे शहनाज ही ‘भाईजान’ सलमानच्या फेव्हरेट क्लबमध्ये सहभागी झाल्याचं म्हटलं जातंय. या ईद पार्टीनंतर सलमान स्वत: शहनाजला तिच्या गाडीपर्यंत सोडायला आला होता. यावेळी शहनाज आणि सलमानची खास बाँडिंग पहायला मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शहनाज आणि सलमान एकमेकांशी हसत हसत गप्पा मारताना दिसत आहेत. शहनाज सलमानला मिठी मारतेय आणि सलमानसुद्धा तिचा पकडून गाडीपर्यंत सोडून येतोय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

ईद पार्टीसाठी सलमानने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर शहनाजसुद्धा काळ्या रंगाच्या पंजाबी सूटमध्ये सुंदर दिसत होती. या पार्टीला दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, कंगना रनौत हे कलाकारसुद्धा उपस्थित होते.

शहनाज गिलने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. पंजाबी गाणी गाणारी आणि म्युझिक अल्बममध्ये झळकणारी शहनाज ही ‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचली. बिग बॉसच्या घरात शहनाजची दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी मैत्री झाली. या दोघांनी बिग बॉसचं तेरावं सिझन गाजवलं होतं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. मात्र आता हळूहळू ती त्यातून सावरू लागली आहे. शहनाजचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.