‘किसी का भाई किसी की जान’नंतर शहनाज गिलकडे हा मोठा चित्रपट, थेट या निर्मात्याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी
किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा बहुचर्चित चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. सलमान खान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
मुंबई : बिग बाॅसमधून करिअरची सुरूवात करणारी शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी ही शहनाज गिल हिला मिळालीये. सलमान खान याच्यासोबत बाॅलिवूडमध्ये डेब्यू शहनाज गिल ही करत आहे. विशेष म्हणजे बिग बाॅसमधून (Bigg Boss) बाहेर पडल्यानंतर शहनाज गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. शहनाज गिल ही नेहमीच चर्चेत असते. शहनाज गिल ही किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे ही महत्वाच्या भूमिकेत आहे. आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
किसी का भाई किसी की जान हा चित्रपट सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील अनेक गाणे अगोदरच रिलीज करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रेक्षकांना सलमान खान याचा लूक जबरदस्त आवडलाय. सलमान खान याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.
फक्त शहनाज गिल हिच नाही तर श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही देखील किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शहनाज गिल हिने मोठा खुलासा केलाय. शहनाज गिल हिने या मुलाखतीमध्ये सलमान खान याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
फक्त सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान याच चित्रपटामध्ये नाही तर शहनाज गिल हिच्याकडे दुसऱ्या एक मोठा चित्रपट असल्याचे शहनाज गिल हिने सांगितले आहे. विशेष म्हणजे रिया कपूर हिच्या आगामी चित्रपटामध्ये शहनाज गिल ही मुख्य भूमिकेत असणार आहे. म्हणजेच किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर शहनाज गिल हिचे नशीब पलटले आहे.
रिया कपूर हिच्या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी शहनाज गिल हिला मिळालीये. इतकेच नाही तर शहनाज गिल हिने सांगितले की, आपल्याकडे अजून बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आहेत. रिया कपूर हिच्या चित्रपटाबद्दल आपण अजून काही जास्त सांगू शकत नसल्याचे देखील शहनाज गिल हिने स्पष्ट केले आहे. म्हणजेच आता हे स्पष्ट झाले आहे की, किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर अजूनही बऱ्याच चित्रपटांमध्ये शहनाज गिल ही दिसणार आहे.