कंगना राणावत आणि अध्ययन यांच्या रिलेशनवर शेखर सुमन यांचा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, इथे फक्त संपवण्यासाठीच

कंगना राणावत ही नेहमीच तिच्या विधानांमुळे वादामध्ये अडकते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूड स्टार असतात. कंगना राणावत ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

कंगना राणावत आणि अध्ययन यांच्या रिलेशनवर शेखर सुमन यांचा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, इथे फक्त संपवण्यासाठीच
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 6:21 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे कलाकार नेहमीच असतात. विशेष म्हणजे कंगना राणावत ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. 2008 मध्ये कंगना राणावत आणि शेखर सुमन (Shekhar Suman) यांचा मुलगा अध्ययन सुमन हे रिलेशनशिपमध्ये होते. अध्ययन सुमन आणि कंगना यांचे अफेअर कोणापासूनच लपून राहू शकले नाही. मात्र, अध्ययन सुमन आणि कंगना राणावत यांच्या नात्याचा शेवट अत्यंत वाईट झाला. कोणीही विचार केला नव्हता की, अध्ययन सुमन (Adhyayan Suman) आणि कंगना राणावत यांच्या नात्याचा शेवट हा अशाप्रकारे होईल. 2008 मध्ये एका चित्रपटानंतर यांची प्रेम कहानी सुरू झाली होती.

आता बऱ्याच वर्षांनंतर अध्ययन सुमन आणि कंगना राणावत यांच्या लव्ह स्टोरीवर शेखर सुमन यांनी भाष्य केले आहे. शेखर सुमन म्हणाले की, मी कंगना आणि अध्ययन यांच्या रिलेशनच्या विरोधात अजिबात नव्हतो. जे काही घडले किंवा त्यावेळी घडत होते, तेंव्हा मी कधीच कंगना हिला काहीच बोललो नाही. कारण ती लढाई ही अध्ययन याची होती.

मुळात म्हणजे मला अध्ययन आणि कंगना यांच्याबद्दल सर्व काही माहिती होते. मात्र, मी कधीच काही बोललो नाही. जे काही होते त्या दोघांचे होते आणि त्यांनाच ती लढाई लढायची होती. मी अशा वडिलांसारखा अजिबात नाहीये की, समोरच्या व्यक्तीला जाऊन माझ्या मुलासाठी काही बोलावे. मी माझ्या मुलाला कधीच म्हणालो नाही की, मला कंगना आणि तुझा रिलेशनच्या काही समस्या आहेत.

मी कधीच कंगना आणि अध्ययन यांच्या रिलेशनच्या विरोधात नव्हतो. मला वाटते की, तो आयुष्यातील एक काळ असतो की, तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये यशस्वी होतात तर कधी अपयशी. मुळात म्हणजे कोणालाच वाटत नव्हते की, यांचे रिलेशन हे यशस्वी व्हावे. लोकांना फक्त तमाशा बघायचा असतो. लोकांना वाटत होते की, अध्ययन आणि कंगना यांचे नाते संपावे.

बऱ्याच वेळा तुमच्या मित्रांना देखील तुमचा आनंद हा बघवत नाही. काही दिवसांपूर्वीच अध्ययन सुमन याने बाॅलिवूडवर काही गंभीर आरोप हे केले होते. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर आरोप केल्यानंतर लगेचच अध्ययन याने देखील आरोप केले. विशेष म्हणजे शेखर सुमन यांनीही बाॅलिवूडमधील काही सत्य सांगितले. शेखर सुमन यांचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.