Shilpa Shetty: राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणाविषयी प्रश्न विचारताच शिल्पा म्हणाली..

आगामी 'निकम्मा' (Nikamma) या चित्रपटात शिल्पा शेट्टी 'सुपरवुमन'ची भूमिका साकारतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने 14 वर्षांचा वनवास संपल्याची भावना तिने व्यक्त केली.

Shilpa Shetty: राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणाविषयी प्रश्न विचारताच शिल्पा म्हणाली..
Shilpa Shetty and Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 12:25 PM

जवळपास 14 वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चित्रपटातून पुनरागमन करतेय. आगामी ‘निकम्मा’ (Nikamma) या चित्रपटात ती ‘सुपरवुमन’ची भूमिका साकारतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने 14 वर्षांचा वनवास संपल्याची भावना तिने व्यक्त केली. नुकताच चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिल्पाच्या आईने व्हिडीओच्या माध्यमातून दिलेला खास संदेश मोठ्या पडद्यावर दाखवला गेला. हा व्हिडीओ पाहून शिल्पासुद्धा भावूक झाली होती. यावेळी तिने दिग्दर्शिक सब्बीर खान यांचेही आभार मानले. या कार्यक्रमात पत्रकारांनी तिला पती राज कुंद्राविषयीही (Raj Kundra) प्रश्न विचारला. मात्र त्यावर तिने उत्तर देणं टाळलं.

राज कुंद्राच्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल शिल्पाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. मात्र तिने त्यावर उत्तर दिलं नाही. अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी राजला अटक झाली होती. पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याचे आरोप त्याच्यावर होते. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ॲप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जात होतं. या प्रकरणात शिल्पाचीही चौकशी करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

पहा शिल्पाचा लूक-

शिल्पाने या वादावर थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी तिच्या आयुष्यातील त्या विशिष्ट टप्प्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मला वाटतं की आम्ही इथे एक नवीन सुरुवात साजरी करण्यासाठी आलो आहोत. सध्या आपण दिग्दर्शक सब्बीर खान आणि कलाकार अभिमन्यू, शर्ली यांच्याविषयी बोलुयात. त्यांनी या चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. हे माझ्याबद्दल किंवा माझ्या आयुष्याबद्दल नाही. जर तो प्रश्न चित्रपटाशी संबंधित असता, तर मी त्याचं उत्तर नक्कीच दिलं असतं.”

“आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलायचं झाल्यास, होय आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशा टप्प्यातून गेलो आहोत. गेली दोन वर्षं फक्त मलाच नाही तर इतरही बऱ्याच लोकांसाठी कठीण गेली. चित्रपटसृष्टीला खूप नुकसान सहन करावं लागलं. कारण बरेच चित्रपट तयार झाले होते, पण थिएटर्स बंद असल्यामुळे ते प्रदर्शित होऊ शकले नव्हते. अभिमन्यू आणि शर्लीने त्यांच्या पदार्पणासाठी दोन वर्षे वाट पाहिली आणि मी माझ्या कमबॅकसाठी 14 वर्षे वाट पाहिली. त्यामुळे आता फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करुयात. आपण सर्वजण वादळाचा सामना करून त्यातून बाहेर आलो आहोत”, असंही ती पुढे म्हणाली.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.