‘आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही!’, राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे जाहीर निवेदन!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) गेल्या अनेक दिवसांपासून पती राज कुंद्रामुळे (Raj Kundra) खूप चर्चेत आली आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

‘आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही!’, राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे जाहीर निवेदन!
शिल्पा-राज
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 1:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) गेल्या अनेक दिवसांपासून पती राज कुंद्रामुळे (Raj Kundra) खूप चर्चेत आली आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीबद्दल अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आज, प्रथमच तिने आपले मौन मोडत या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘हो! गेले काही दिवस आव्हानात्मक होते, प्रत्येक गोष्टी. खूप अफवा पसरल्या आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी आणि (नसलेल्या) हितचिंतकांनी माझ्यावर बर्‍याच अनावश्यक टिपण्या केल्या.

बरेच ट्रोलिंग/प्रश्न विचारले… फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही.

माझी भूमिका…मी अद्याप कोणतीही कमेंट केलेली नाही.

आणि या प्रकरणात असे करणे टाळत राहीन, कारण ते न्यायालयीन प्रकरण आहे, म्हणून कृपया माझ्या वतीने खोटे कोट देणे थांबवा.

एक सेलिब्रिटी म्हणून “कधीही तक्रार करू नका, कधीही खुलासा देऊ नका” या माझ्या तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती करेन. मी एवढेच म्हणेन की, ही चालू असलेली तपासणी न्यायालयीन असल्याने मला मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते – विशेषत: आई म्हणून – माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि तुम्हाला विनंती करते की, सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवरून वक्तव्य करण्यापासून दूर राहा.

मी कायद्याचे पालन करणारी एक भारतीय नागरिक आहे आणि गेली 29 वर्षांपासून खूप मेहनतीने काम करत आहे. लोकांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणालाही निराश केलेले नाही.

तर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी तुम्हाला विनंती करतो की, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या.

सत्यमेव जयते!

– शिल्पा शेट्टी कुंद्रा’

पाहा पोस्ट :

राजच्या अटकेचे नेमके कारण

19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात अटक केली होती, ज्याला त्याच्या वकिलांनी बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. राज कुंद्राची अटक बेकायदेशीर आहे, या युक्तिवादाला उत्तर देताना सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, राज कुंद्राच्या अटकेचे खरे कारण या प्रकरणाचे पुरावे नष्ट करणे हे आहे. राज कुंद्राचे आयटी प्रमुख रायन थोर्पे (Ryne Thorope) यांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

(Shilpa Shetty Kundra Share her official statement on Raj Kundra Case said we don’t deserve media trial)

हेही वाचा :

अभिनेत्री झोयाचा दावा – राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड ऑडिशनची मागणी, सिंगापूरहून आला होता फोन

Nandita Dutta Case: कोलकाता पॉर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफर अटक, नव्या मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.