‘माझ्या नवऱ्याला जामीन मिळाला तर….’, पती राज कुंद्रासाठी शिल्पा शेट्टीने केला नवा हेअर कट?
बॉलिवूड दिवा शिल्पा शेट्टीने काही काळापूर्वी चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते, जेव्हा तिने इंस्टाग्रामवर अंडरकट हेअरकट दाखवत एक व्हिडीओ शेअर केला होता. शिल्पाच्या या बोल्ड हेअरकटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली.
मुंबई : बॉलिवूड दिवा शिल्पा शेट्टीने काही काळापूर्वी चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते, जेव्हा तिने इंस्टाग्रामवर अंडरकट हेअरकट दाखवत एक व्हिडीओ शेअर केला होता. शिल्पाच्या या बोल्ड हेअरकटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली. पण, तुम्हाला माहित आहे का शिल्पा शेट्टीने अंडरकट हेअरकट का केला आहे? याचे कारण आता सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे.
यामुळे शिल्पाने घेतली अंडरकट हेअरस्टाईल!
हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासाठी तिच्या केसांचा हा अनोखा कट केला आहे. होय… पती राज कुंद्रासाठी शिल्पाने तिच्या डोक्याच्या एका छोटाशा भागाचे मुंडण केले होते. पिंकविलाच्या वृत्तानुसार, शिल्पाने नवस केला होता की, जर तिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणी जामीन मिळाला, तर ती त्याच्या डोक्याचा एक भाग मुंडण करेल. राज कुंद्राला जामीन मिळाल्यावर अभिनेत्रीने आपला नवस पूर्ण केला आहे.
View this post on Instagram
राज कुंद्रा 2 महिने तुरुंगात
शिल्पाचा पती राज कुंद्रा 2 महिने तुरुंगात होता. त्याला पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. राज कुंद्रा जवळपास 2 महिने तुरुंगात होता. राज कुंद्रा 21 सप्टेंबरला तुरुंगातून बाहेर आला. त्याने 64 दिवस तुरुंगात काढले होते. राज कुंद्राला पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. त्याच्यावर अश्लील मजकूर तयार करून अॅप्सवर अपलोड केल्याचा आरोप होता. या संपूर्ण प्रकरणात फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, जेव्हा त्याचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा जबाबही नोंदवला गेला होता. यावेळी शिल्पाने पतीचा बचाव केला होता. अभिनेत्री म्हणाली होती की, तिचा नवरा अश्लील नाही तर कामुक सामग्री बनवायचा. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा यांनी अद्याप जाहीर हजेरी लावलेली नाही. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी सध्या अलिबागमध्ये फॅमिलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. शिल्पा आपल्या मुलांसोबत सुट्टीवर गेल्याचे फोटो समोर आले होते.
काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले होते.