Shruti Haasan: रुग्णालयात दाखल झाल्याच्या चर्चांवर श्रुती हासनने शेअर केला व्हिडीओ; PCOS चं निदान झाल्याचा केला खुलासा
सोशल मीडियावर श्रुतीच्या आजारपणावरून काही चर्चा होऊ लागल्या. तिची तब्येत ठीक नसून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याइतपत गंभीर प्रकृती असल्याच्या या चर्चा होत्या. त्यावर श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासनने (Shruti Haasan) नुकताच खुलासा केला की तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि एंडोमेट्रिओसिसचं निदान झालं आहे. PCOS चा सामना ती कशा पद्धतीने करत आहे आणि खाण्यापिण्याच्या योग्य सवयीने ती त्यावर कसं नियंत्रण आणतेय, याबद्दल तिने सांगितलं. सोशल मीडियावर श्रुतीच्या आजारपणावरून काही चर्चा होऊ लागल्या. तिची तब्येत ठीक नसून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याइतपत गंभीर प्रकृती असल्याच्या या चर्चा होत्या. त्यावर श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचप्रमाणे आपली प्रकृती ठीक असल्याचं तिने म्हटलंय.
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये श्रुतीने म्हटलंय, “ज्याठिकाणी मी नॉन-स्टॉप काम करतेय आणि सर्वोत्तम वेळ घालवतेय, अशा हैदराबादमधील सर्वांना नमस्कार! मला फक्त हेच स्पष्ट करायचं आहे की मी माझ्या वर्कआउटबद्दल काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती. मी PCOS चा सामना करतेय आणि ही समस्या बर्याच स्त्रियांना असते. होय, हे आव्हानात्मक नक्कीच आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी आजारी आहे किंवा कोणत्याही प्रकारची गंभीर स्थिती आहे. सोशल मीडियावर त्यावरून बऱ्याच अफवा पसरत आहेत. मी रुग्णालयात दाखल झाले की काय असं विचारायला मला अनेक कॉल आले. मी पूर्णपणे ठीक आहे. मला अनेक वर्षांपासून PCOS चा त्रास आहे पण माझी तब्येत बरी आहे. तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.”
पहा व्हिडीओ-
Actress @shrutihaasan slashes out baseless rumours on her health issues and confirms that she is hale and healthy.
Check out her video statement.#ShrutiHaasan pic.twitter.com/37VrCyY6XH
— Vamsi Kaka (@vamsikaka) July 5, 2022
PCOS हा आजार नाही तर एक सिंड्रोम आहे. ज्यात स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आणि अनियमित मासिक पाळीसारख्या समस्या दिसून येतात. अनियमित मासिक पाळी हे पीसीओएसचं पहिलं लक्षण आहे. रक्त तपासणी आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून त्याचं निदान केलं जातं. फास्ट फूड, बैठी जीवनशैली यांमुळे तरुणींमुळे पीसीओएसची समस्या वाढत आहे.