नऊ वर्ष लहान क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत लग्नाची चर्चा, आता अभिनेत्रीने शेअर केला थेट ‘हा’ फोटो, मोठी खळबळ..
Ridhima Pandit and Shubman Gill : अभिनेत्री रिद्धीमा पंडीत तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आलीये. रिद्धीमा पंडीत ही 2024 मध्ये क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जातंय. शुबमन गिल याला रिद्धीमा पंडीत डेट करत असल्याचे सांगितले जातंय. आता नुकताच एक फोटो रिद्धीमा पंडीतने शेअर केलाय.
अभिनेत्री अभिनेत्री रिद्धीमा पंडीत ही गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आलीये. रिद्धीमा पंडीत ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत रिद्धीमा पंडीत ही लग्न करणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली. हेच नाही तर दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचेही सांगितले गेले. रिद्धीमा पंडीत ही शुबमन गिल याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. हेच नाही तर यंदाच डिसेंबरमध्ये यांचे लग्न होणार असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर रिद्धीमा पंडीतकडून मोठा खुलासा करण्यात आला.
सतत शुबमन गिल याच्यासोबत नाव जोडले जात असतानाच आता रिद्धीमा पंडीत हिने असा फोटो शेअर केलाय की, या फोटो पाहून लोक हैराण झालेत. सोशल मीडियावर कमेंट करत रिद्धीमा पंडीत हिला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अखेर रिद्धीमा पंडीत हिच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न चाहत्यांकडून सातत्याने विचारला जातोय.
रिद्धीमा पंडीत हिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये चक्क ती रडताना दिसत आहे. यावेळी मागे पूर्ण अंधार दिसत आहे आणि रिद्धीमा पंडीतच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. या फोटोनंतर रिद्धीमा पंडीत हिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. रिद्धीमा पंडीत हिला नेमके काय झाले हा प्रश्न चाहते विचारत आहेत.
View this post on Instagram
रिद्धीमा पंडीत हिचा हा फोटो अनेकांनी शुबमन गिल यालाच टॅग केलाय. अनेकांनी म्हटले आहे की, बहुतेक शुबमन गिल आणि रिद्धीमा पंडीत यांच्यात वाद झालाय. हेच नाही तर रवीना टंडन हिची लेक राशा हिने देखील या फोटोवर कमेंट करून रिद्धीमा पंडीतला विचारले की, तुम्हाला रडायला काय झाले?
यासोबतच या फोटोमध्ये रिद्धीमा पंडीत ही खूप जास्त दु:खी देखील दिसत आहे. रिद्धीमा पंडीत ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रिद्धीमा पंडीत दिसते. रिद्धीमा पंडीतने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. यासोबतच तिने काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.