Video | …जेव्हा ‘बिग बी’ छोट्या श्वेता आणि अभिषेकची ओळख करून देतात! पाहा Throwback Video
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan-Nanda) कदाचित चित्रपट विश्वापासून दूर असेल, पण तिची फॅन फॉलोव्हिंग बरीच मजबूत आहे. श्वेताच्या चाहत्यांची यादी देखील खूप मोठी आहे.
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan-Nanda) कदाचित चित्रपट विश्वापासून दूर असेल, पण तिची फॅन फॉलोव्हिंग बरीच मजबूत आहे. श्वेताच्या चाहत्यांची यादी देखील खूप मोठी आहे. श्वेता बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. अशा परिस्थितीत आता श्वेताने चाहत्यांसाठी एक खूप जुना व्हिडीओ शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे (Shweta Bachchan Share throwback video on social media).
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली श्वेता रोज चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशा परिस्थितीत श्वेताने आता एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडीओमध्ये लहान श्वेतासोबत भाऊ अभिषेक बच्चनही दिसला आहे.
जेव्हा अमिताभ ओळख करून देतात…
श्वेताने चाहत्यांसोबत शेअर केलेला हा व्हिडीओ खूप जुना आहे. या कारणास्तव त्यात काहीही स्पष्ट दिसत नाही. मात्र, व्हिडीओमध्ये आपण पाहु शकता की, अमिताभ बच्चन अभिषेक आणि श्वेताला स्टेजवर बोलवतात. एकच नाही तर बिग बींनी आपल्या दोन मुलांची प्रेक्षकांशी ओळख करून दिली. यासह, अमिताभ बच्चन यांच्या आदेशानुसार दोन्ही मुले माईकवर हॅलो देखील म्हणत. यानंतर आपण पुन्हा अभिषेक आणि श्वेता तिथून निघून जातात.
अमिताभ, अभिषेक आणि श्वेताचा हा न पाहिलेला व्हिडीओ पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना श्वेता बच्चन यांनी लिहिले की, ‘तुम्ही माला शोधत आहात का?’ श्वेताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा श्वेताची पोस्ट
View this post on Instagram
बिग बींची लाडकी श्वेता
लेक श्वेता बच्चन ही अमिताभ बच्चन यांच्या अगदी जवळ आहे आणि त्यांची खूप लाडकी देखील आहे. अनेकदा चाहत्यांना अमिताभ आणि श्वेताचे बॉन्डिंगही पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा अमिताभ बच्चन यांना संधी मिळते, तेव्हा ते आपल्या मुलीचे मन मोकळेपणाने कौतुक करतात. श्वेता स्वत: आता दोन मुलांची आई आहे.
अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभसोबत इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीही दिसणार आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘झुंड’सारखे अनेक चित्रपट बिग बींकडे आहेत. छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन पुन्हा केबीसी होस्ट करताना दिसणार आहे.
(Shweta Bachchan Share throwback video on social media)
हेही वाचा :
Goodbye College | आता वडिलांचं स्वप्न साकार करणार, इरफान खानचा लेक बाबिलने शिक्षणाला म्हटले ‘अलविदा’