Thank God | सिद्धार्थचा ‘थँक्स गॉड’चित्रपटातील पहिला लूक बघितला का?
सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) थँक्स गॉड (Thank God) चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरुवात केले आहे.
मुंबई : सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) थँक्स गॉड (Thank God) चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरुवात केले आहे. आता सिद्धार्थने चित्रपटातील त्याच्या पहिल्या लूकचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये सिद्धार्थ पोलिस दिसत आहे आणि पोलिस जीपमध्ये बसलेला आहे. फोटो शेअर करताना सिद्धार्थने लिहिले की, मी रोहित शेट्टी यांना हाय म्हणायला जात आहे. थँक्स गॉड चित्रपटामध्ये सिद्धार्थ आणि अजय देवगन प्रथमच एकत्र काम करणार आहेत. (Sidharth Malhotra shared the first look of Thank God movie)
थँक्स गॉड चित्रपटातून विनोदाबरोबरच एक चांगला संदेशही दिला जाईल. या दोघांशिवाय या चित्रपटात रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी या दोघांसह रकुलने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दे दे प्यार दे मध्ये तिने अजयसोबत काम केले होते आणि मरजावांमध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बरीच वाट पाहिली आहे.
View this post on Instagram
अजय देवगणबरोबर पुन्हा काम करताना मला खूप आनंद वाटत आहे, ज्यांना मी बर्याच वर्षांपासून ओळखतो आहे आणि त्यात सिद्धार्थ आणि रकुलसुद्धा यात सहभागी झाल्याचा आनंद आहे. ‘सिद्धार्थ शेवटी ‘मरजावां ‘ चित्रपटात दिसला होता. थँक गॉड व्यतिरिक्त सिद्धार्थ शेरशाहमध्ये दिसणार असून या चित्रपटात सिद्धार्थसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाचे नवीन वर्ष जोरदार स्वागत केले होते. बऱ्याच जणांनी आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले तर काहीजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर गेले. कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गेले आहेत. दोघांनीही मालदीवमधील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले होते.
संबंधित बातम्या :
Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!
आजपासून चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु, बदलले हे नियम पाहा!
(Sidharth Malhotra shared the first look of Thank God movie)