Rakhi Sawant | राखी सावंत हिचा तो व्हिडीओ पाहून लोक संतापले, ड्रामा क्वीन ट्रोल

| Updated on: Apr 20, 2023 | 3:35 PM

राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र, यावेळी एका व्हिडीओमुळे राखी सावंत हिला जोरदार ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

Rakhi Sawant | राखी सावंत हिचा तो व्हिडीओ पाहून लोक संतापले, ड्रामा क्वीन ट्रोल
Rakhi Sawant
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर केले. फक्त लग्न नाही तर आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. लग्नानंतर राखी सावंत हिने आपले नाव फातिमा असे ठेवले आहे. राखी सावंत रमजान सुरू झाल्यापासूनच सोशल मीडियावर (Social media) सतत रोजा, इफ्तार पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी विमानतळावर रोजा सोडताना राखी सावंत ही दिसली होती. ज्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.

बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यावर राखी सावंत हिने सर्वांना मोठा धक्का देत थेट लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. आदिल दुर्रानी याच्यासोबत राखी सावंत हिने अगोदर कोर्टामध्ये लग्न केले आणि त्यानंतर निकाह केला. आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यामध्ये सुरूवातीला सर्वकाही व्यवस्थित सुरू होते.

राखी सावंत हिने तिच्या आईच्या निधनानंतर आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर हे सर्व प्रकरण थेट कोर्टामध्ये गेले. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. राखी सतत त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. सध्या राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

राखी सावंत हिच्या या व्हिडीओमुळे ती सोशल मीडियावर तूफान ट्रोल होताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी राखी सावंत हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. नुकताच राखी सावंत हिने नमाजच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही नमाज अदा करताना दिसत आहे. यावरूनच आता राखी सावंत हिला ट्रोल केले जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राखी सावंत हिने नेल पॉलिश लावली आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओमध्ये गाणे देखील ऐकू येत आहे. यामुळेच राखी सावंत हिला ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, नमाजमध्ये गाणी वाजत नाहीत आणि नेल पॉलिशही चालत नाही. दुसऱ्याने लिहिले की, राखी सावंत हिने सर्व गोष्टींचा मजाक लावला आहे. या व्हिडीओमुळे राखी सावंत हिला ट्रोल केले जात आहे.