Sonu Nigam Corona | सोनू निगमला कोरोनाची लागण, पत्नी आणि मुलगा देखील कोव्हिड पॉझिटिव्ह!
भारतात कोरोना व्हायरसचा कहर मनोरंजन क्षेत्रावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत एकामागून एक अनेक मोठे सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला (Sonu Nigam Corona Positive) देखील कोरोना झाला आहे.
मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा कहर मनोरंजन क्षेत्रावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत एकामागून एक अनेक मोठे सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला (Sonu Nigam Corona Positive) देखील कोरोना झाला आहे. सोनू निगमसोबत त्याची पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. सोनू निगमने व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘मी यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर सीझन 3चे शूटिंग करण्यासाठी भारतात यावे लागले होते. म्हणूनच माझी चाचणी देखील झाली आणि त्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी पुन्हा चाचणी झाली आणि पुन्हा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.’
मी काही मरणार नाही!
सोनू पुढे म्हणाला की, मला वाटतं लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावं लागेल. मी व्हायरल इन्फेक्शन आणि गळा खराब असताना मैफिली देखील केल्या आहेत. आणि त्यापेक्षा हे बरेच चांगले आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, पण मी काही मरणार नाही. माझाही घसा ठीक आहे. पण माझ्यामुळे ज्यांना त्रास झाला त्यांच्याबद्दल मला वाईट वाटते.’
View this post on Instagram
सोनूला सतावतेय ‘ही’ भीती
सोनू निगम पुढे म्हणाला की, ‘या लाटेत किती लोक अडकले जात आहेत, त्याबद्दल आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या खूप वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. मला आपल्या सर्वांचे वाईट वाटते, कारण काम नुकतेच सुरू झाले आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला कोणतेही काम न करता पुन्हा घरी बसावे लागेल. गेल्या दोन वर्षांपासून कामावर परिणाम होत असल्याने मला थिएटर लोक आणि चित्रपट निर्मात्यांचेही वाईट वाटते. पण आशा आहे की, लवकरच सर्व काही ठीक होईल.’
सोनूच्या मुलाला आणि पत्नीलाही कोरोनाची लागण
व्हिडीओच्या शेवटी सोनूने सांगितले की, त्याचा मुलगा आणि पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दीड महिन्यांपासून तो आपल्या मुलाला भेटलेला नाही, त्यामुळे तो आपल्या मुलाला भेटण्यासाठी दुबईला आला आहे. पण, आता तो आपल्या मुलासोबत जास्त वेळ घालवू शकतो, असेही सोनूने सांगितले.
हेही वाचा :
कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?
नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!