Good News | ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटोकडे ‘गोड बातमी’, सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत शेअर केला आनंद!

‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो (Freida Pinto) हिने चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. लवकरच ती आई बनणार आहे. अभिनेत्री फ्रिडा पिंटोने मंगळवारी जोडीदार कॉरी ट्रॅन (Cory Tran) याच्यासह एक फोटो शेअर करुन तिच्या गरोदरपणाची बातमी दिली आहे.

Good News | ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटोकडे 'गोड बातमी', सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत शेअर केला आनंद!
फ्रिडा पिंटो-कॉरी
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 3:31 PM

मुंबई : ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो (Freida Pinto) हिने चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. लवकरच ती आई बनणार आहे. अभिनेत्री फ्रिडा पिंटोने मंगळवारी जोडीदार कॉरी ट्रॅन (Cory Tran) याच्यासह एक फोटो शेअर करुन तिच्या गरोदरपणाची बातमी दिली आहे. या दरम्यान फ्रिडाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. काळ्या फुलांच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना फ्रिडाने लिहिले, ‘बेबी ट्रॉन येत आहे’. पहिल्या फोटोमध्ये जिथे हे दोघेही कॅमेराकडे पहात आहेत आणि पोझ देत आहेत, दुसऱ्या फोटोमध्ये कॉरी आणि फ्रिडा एकमेकांच्या नजरेत हरवले आहेत (Slumdog Millionaire actress Freida Pinto announces pregnancy with fiance Cory Tran).

फ्रिडाच्या या पोस्टवर चाहत्यांव्यतिरिक्त अनेक सेलेब्सनीही खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. प्रत्येकजण दोघांचे अभिनंदन करत आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने करत म्हटले की, “अरे व्वा! फ्रिडा आणि कॉरी तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन.’ या नंतर मृणालने आणखी एक टिप्पणी केली, ‘मी किंचाळत आणि नाचत आहे.’ तर, नरगिस फाखरी हिने टिप्पणी केली, ‘वा! दोघांचे खूप अभिनंदन’.

पाहा फ्रिडाची पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

2008 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या ब्रिटिश ड्रामा फिल्ममधून सर्वांचे मन जिंकणाऱ्या फ्रिडाने 2019 मध्ये कॉरीशी साखरपुडा केला होता. एंगेजमेंटची बातमी सांगताना फ्रिडाने लिहिले होते की, ‘आयुष्य आता समजले आहे, जग आता समजत आहे, जुन्या प्रेमी प्रेमाबद्दल जे काही म्हणायचे ते जाणवत आहेत. तू माझं प्रेम आहेस जो माझ्या आयुष्यात आला आहेस आणि तू आता इथेच राहशील, कारण मी तुला थांबवून ठेवेन…’ फ्रिडाचा जोडीदार, कॉरी ट्रॅन हा एक छायाचित्रकार आहे. ती अनेकदा कॉरीसह आपले फोटो शेअर करत असते.

आईमुळे धरली मनोरंजन विश्वाची वाट!

फ्रिडाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिने आपल्या आईमुळे मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. तिने यातच आपले करिअर करावे, अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यानंतर 2007मध्ये, एका एजन्सीने फ्रिडाला ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी ऑडिशन द्यायला सांगितले होते, ज्यामध्ये तिची निवड झाली. या चित्रपटात फ्रिडाबरोबर अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसला होता.

(Slumdog Millionaire actress Freida Pinto announces pregnancy with fiance Cory Tran)

हेही वाचा :

Photo : ‘फॅशन का हैं ये जलवा’ प्रियांका चोप्राची न्यूयॉर्कमध्ये धमाल, थाई-स्लिट ड्रेस कॅरी करत शेअर केले फोटो

Sonu Sood | कोरोना प्रतिबंधक औषधं प्रकरणात नाव खराब करण्याचा प्रयत्न, सोनू सूदची मुंबई हायकोर्टात धाव!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.