‘Slumdog Millionaire’ फेम मधुर मित्तलला कोर्टाचा दिलासा, मैत्रिणीने केलेला शोषणाचा आरोप

काही दिवसांपूर्वी 'स्लमडॉग मिलियनेअर' फेम अभिनेता मधुर मित्तलवर त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

‘Slumdog Millionaire’ फेम मधुर मित्तलला कोर्टाचा दिलासा, मैत्रिणीने केलेला शोषणाचा आरोप
मधुर मित्तल
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 10:34 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘स्लमडॉग मिलियनेअर’ फेम अभिनेता मधुर मित्तलवर त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आता मधुरला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मधुरच्या अटकेला 26 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे (Slumdog Millionaire fame actor Madhur Mittal get relief from section court).

शुक्रवारी (12 मार्च) मधुर याच्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने सांगितले की, जर गुन्हा आधी घडला होता, तर या प्राणघातक हल्ल्याचा एफआयआर नोंदवण्यासाठी इतका वेळ का लागला? 13 फेब्रुवारी रोजी मधुरने त्याच्या मैत्रिणीवर अत्याचार केले, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. तर, 23 फेब्रुवारीला या विरोधात एफआयआर दाखल केला गेला. यामुळे तक्रार दाखल करण्यात इतका उशीर का झाला? यावरून असे दिसते की, मधुरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर कोर्टाने मधुरच्या अटकेला 26 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना त्याच्यावर जबरदस्तीने कारवाई करू नये, असे सांगितले आहे.

काय घडले?

रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार 13 फेब्रुवारीचा आहे, जेव्हा मधुरने आपल्या एक्स-गर्लफ्रेंडने घरी जाऊन तिच्याशी वाईट वागणूक केली होती. प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, मुलीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मधुरची भेट घेतली होती आणि काही दिवसांनी मधुरने त्या महिलेस जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडले. या महिलेच्या वकिलाचे म्हणणे आहे की, तिच्या क्लायंटने 11 फेब्रुवारी रोजी म्हणजेच घडल्या प्रकाराच्या दोन दिवस आधी मधुरशी सगळे संबंध तोडले होते.

वकील पुढे म्हणाले की, मधुर माझ्या क्लायंटला जबरदस्ती रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्याशी काहीच न बोलता, तिची मान पकडली आणि तिला अनेक वेळा मारहाण केली, केस खेचले. या हाणामारीमुळे माझ्या अशीलाला खूप लागले आहे. त्याशिवाय हा लैंगिक हल्ला देखील होता. तिच्या संपूर्ण चेहऱ्याला दुखापत झाली आहे (Slumdog Millionaire fame actor Madhur Mittal get relief from section court).

मधुरची चुप्पी!

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता मधुर मित्तल याच्याविरूद्ध अनेक कलमांअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मधुरवर 354, 354 ए, 354 बी, 509 आणि 323 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मधुर याने यासंदर्भात अद्याप कोणतेही जाहीर विधान केलेले नाही.

‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चर्चित चित्रपटामध्ये मधुरने ‘सलीम’ची भूमिका केली होती, याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या प्रकरणात कोणते अपडेट येतील, याबद्दल आम्ही आपल्याला निश्चितपणे माहिती देऊ!

(Slumdog Millionaire fame actor Madhur Mittal get relief from section court)

हेही वाचा :

‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!

Disha Patani | शूटिंग संपली तरी गाडीच नाही, दिशा पाटनीची थेट ‘ऑटो स्वारी’!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.