Abu Azmi | रणवीर सिंहने नंगानाच केला तरी चालतोय, पण परीक्षेला हिजाब चालत नाही.. अबू आझमींचा सोलापुरात संताप!

आता रणवीरच्या फोटोशूट वादामध्ये चक्क अबू आझमी यांनीही उडी घेतलीयं. सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी म्हणाले की, रणवीर सिंहने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगानाच केला तरी आम्हाला काही अडचण नाही.

Abu Azmi | रणवीर सिंहने नंगानाच केला तरी चालतोय, पण परीक्षेला हिजाब चालत नाही.. अबू आझमींचा सोलापुरात संताप!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 1:25 PM

सोलापूर : नुकतेच रणवीर सिंहने (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट केल्याने मोठा गोंधळ उडालायं. रणवीरचे न्यूड फोटो सध्या चर्चेचा विषय बनले असून सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी रणवीरला या फोटोंवरून थेट टार्गेट केले आहे. काही अभिनेत्री देखील रणवीरच्या या फोटोशूटच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. तसेच काहींनी या फोटोंवर रणवीरचे समर्थन देखील केल्याचे चित्र आहे. या फोटोशूटमध्ये (Photoshoot) रणवीर पूर्णपणे नग्न दिसतोयं. यामुळे हे काहींच्या नक्कीच पचणी पडलेले दिसत नाहीयं.

रणवीरच्या न्यूड फोटोशूट वादामध्ये चक्क अबू आझमी यांची उडी

आता रणवीरच्या फोटोशूट वादामध्ये चक्क अबू आझमी यांनीही उडी घेतलीयं. सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी म्हणाले की, रणवीर सिंहने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगानाच केला तरी आम्हाला काही अडचण नाही. मात्र, जे लोक हिजाब घालतात त्यांना या देशात विरोध कसा होऊ शकतो? हिजाब परिधान करणाऱ्यांना ठिकठिकाणी अडवलं जात आहे. त्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. जर तुम्हाला अडचण असेल सुरक्षितेबाबत काळजी वाटत असेल तर वैयक्तिक त्यांची तपासणी करून चौकशी करा. मात्र हिजाबवर बंदी तुम्ही आणू शकत नाही

हे सुद्धा वाचा

सार्वजनिक स्थळावरती तुम्ही नग्न फिरू शकत नाही

सार्वजनिक स्थळावरती तुम्ही नग्न फिरू शकत नाही, हे कायद्याने चुकीचे आहे. इतकेच नाही तर पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले की, रणवीर सिंहवर गुन्हा दाखल करण्याइतका मी मोठा नाही. मी अतिशय छोटासा व्यक्ती आहे, माझं कोण ऐकणार? मी जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ठेवला आहे जनतेने काय स्वीकारायचे ते ठरवावे. एकंदरीतच काय तर रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर देशात एकच गोंधळ निर्माण झालायं. सोशल मीडियावर तर हे फोटो व्हायरल झाल्यापासून अनेक प्रकारचे मीम्स प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रणवीरच्या या लेटेस्ट स्टाइलने अनेकजण आर्श्चयचकित झालेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.