Raj Kundra | सामान्य कुटुंबात जन्म, शिक्षणही अर्धवटच, नेपाळला गेल्यावर सुचली बिझनेसची कल्पना! वाचा राज कुंद्राबद्दल काही खास गोष्टी

एका सामान्य कुटुंबात जन्मेलेला हा मुलगा नोकरीचा विचार न करता थेट व्यवसायात शिरला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगपासून ते बिटकॉईन घोटाळ्यापर्यंत राज कुंद्रा यांचे नाव अनेक वादात देखील अडकले आहे.

Raj Kundra | सामान्य कुटुंबात जन्म, शिक्षणही अर्धवटच, नेपाळला गेल्यावर सुचली बिझनेसची कल्पना! वाचा राज कुंद्राबद्दल काही खास गोष्टी
उद्योगपती राज कुंद्रा, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 5:11 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. अश्लील चित्रपट बनवून ते अ‍ॅप्सवर प्रदर्शित केल्याबद्दल राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्रा यांचे नाव एखाद्या वादविवादात अडकलेय, असे पहिल्यांदाच घडत नाहीय. राज कुंद्रा आणि वादांचा तसा दीर्घ संबंध आहे.

एका सामान्य कुटुंबात जन्मेलेला हा मुलगा नोकरीचा विचार न करता थेट व्यवसायात शिरला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगपासून ते बिटकॉईन घोटाळ्यापर्यंत राज कुंद्रा यांचे नाव अनेक वादात देखील अडकले आहे.

वडील कंडक्टर तर आई दुकानात नोकरीला!

उद्योगपती राज कुंद्राचे आई वडील भारतातील लुधियानातून कामानिमित्ताने ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. याच ठिकाणी ते बस कंडक्टर म्हणून काम करू लागले. त्याचवेळी त्याची आई एका स्थानिक दुकानात सहाय्यक म्हणून काम करत होत्या. राज कुंद्राचा जन्म ब्रिटनमध्येच झाला. त्यामुळे राज हा ब्रिटनचा नागरिक आहे. शिक्षणात स्वारस्य नसलेल्या राज कुंद्राने वयाच्या 18व्या वर्षी अर्ध्यावरच शिक्षण सोडलं.

नेपाळ ट्रीप ठरली व्यवसायाचा पाया

दरम्यान राज कुंद्रा नेपाळमध्ये गेले होते. तिथे त्यांना एका व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी स्थानिक शाली विकत घेऊन त्या युकेमध्ये विकण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने हिऱ्यांचा व्यापार सुरु केला. अनेक देशांत त्यांचा हा व्यापार सुरु होता. त्यांनी ‘आरके कलेक्शन’ नावाची कंपनी सुरु केली. यातून त्यांनी फॅशन उद्योगात पदार्पण केलं आणि इथूनच त्यांची भरभराट झाली.

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट

राज कुंद्राने 2005 मध्ये कविताशी लग्न केले होते, परंतु हे नाते तीन वर्षेही टिकले नाहीत. 2007मध्ये राज कुंद्राने कविताशी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच 2009 मध्ये त्यांनी शिल्पा शेट्टीशी लग्न केले. कविताशी ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या एका मुलाखतीत राज कुंद्राने आपली माजी पत्नी कवितावर गंभीर आरोप केले. या वृत्तानुसार, त्याने दावा केला होता की, कविताचे त्याच्या बहिणीच्या पतीशी प्रेमसंबंध होते. या विषयावरही बरेच वादंग झाले.

शिल्पा सोबत थाटला संसार

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने 22 नोव्हेंबर 2009 रोजी सातफेरे घेतले. लग्नाच्या दोन वर्षांनी, 21 मे 2012 रोजी शिल्पा आणि राज यांना त्यांच्या संसारात पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यांच्या मुलाचं नाव विवान आहे. तर, 2020मध्ये राज आणि शिल्पाला सरोगेसीद्वारे कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी या चिमुकलीचं नाव ‘समीशा’ असं ठेवलं आहे.

(Some unknown things about Shilpa Shetty’s Husband Raj Kundra)

हेही वाचा :

Raj Kundra : राज कुंद्रांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, डर्टी पिक्चरची पाळंमुळं खोदणार!

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.