Khoya Khoya Chand | केवळ सलमानशी लग्न करण्यासाठी सोमी अलीने धरली बॉलिवूडची वाट, ब्रेकअप होताच परतली मायदेशी!

1991मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित झाला होता. सलमानचा हा चित्रपट सोमी अली  (Somy Ali) हिने अमेरिकेच्या चित्रपटगृहात पाहिला होता. घरी येताच तिने आईला सांगितले की, "आई, मी उद्या भारतात जात आहे."

Khoya Khoya Chand | केवळ सलमानशी लग्न करण्यासाठी सोमी अलीने धरली बॉलिवूडची वाट, ब्रेकअप होताच परतली मायदेशी!
सोमी अली-सलमान खान
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 8:09 AM

मुंबई : 1991मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित झाला होता. सलमानचा हा चित्रपट सोमी अली  (Somy Ali) हिने अमेरिकेच्या चित्रपटगृहात पाहिला होता. घरी येताच तिने आईला सांगितले की, “आई, मी उद्या भारतात जात आहे.” यावर आश्चर्यचकित झालेल्या आईने ‘का?’ असे विचारले. तर यावर उत्तर देताना सोमीने सांगितले की, मला सलमान खानसोबत लग्न करायचे आहे आणि ती भारतात निघून आली (Somy Ali return to America after breakup with salman khan know the reason).

25 मार्च 1976 रोजी कराची शहरात सोमीचा जन्म झाला होता. त्यानंतर तिचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले. पण सलमान खानला पहिल्यांदा पडद्यावर पाहिल्यानंतर ती पूर्णपणे त्याच्या पडली होती. त्यानंतर तिने भारतात येऊन बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची योजना आखली. मुंबईत पोहोचताच तिने प्रथम तिचे फोटोशूट करून घेतले आणि नंतर ती चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पूर्णपणे तयार झाली होती.

पहिलंच काम सलमानसोबत!

तिची इच्छा इतकी दृढ होती की, ती मुंबईत येताच तिला सलमान खानबरोबर काम मिळालं. पहिल्याच चित्रपटात सोमीने सलमान खानबरोबर काम केलं, हा चित्रपट ‘बुलंद’ होता. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, पण हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान देखील सोमीला आपले हृदय देऊन बसला.

‘बुलंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता, पण सोमीला तिच्या पहिल्या चित्रपट ‘अंत’पासून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता, हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत दिसला होता. सुनील शेट्टी यांनी इंडस्ट्रीमध्ये सोमी अलीला बरीच साथ दिली. त्याने नेहमीच तिला मदत केली आणि तिचे मार्गदर्शन केले.

सोमीची कारकीर्द

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमी अलीने तिच्या 8 वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीत 10 चित्रपटांत भूमिका केली. तिने कदाचित कमी चित्रपटांमध्ये काम केले असेल, परंतु सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. या यादीत सलमान खान, संजय दत्त, गोविंदा, मिथुन दा यांच्यासह अनेक बड्या कलाकारांचा समावेश होता. सलमान खान आणि सोमीचे नाते एकूण 8 वर्षे टिकले, परंतु त्यानंतर काही वर्षांनी ती सलमान खानपासून विभक्त झाली. सलमान खानपासून विभक्त होताच तिने इंडस्ट्रीमध्ये काम करणेदेखील बंद केले.

सलमानने फसवलं!

22 वर्षानंतर सोमीला सलमान खानपासून विभक्त होण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली, “सलमान खानने मला फसवले. या कारणास्तव, मी त्याच्यापासून दूर गेले.” सोमीची कहाणी पाहिल्यास असे वाटते की, ती केवळ सलमान खानबरोबर काही वेळ घालवण्यासाठी भारतात आली होती आणि बॉलिवूडमध्ये काम करणे हे तिचे उद्देश्य नव्हते. या सर्व प्रकारणानंतर ती अमेरिकेत परतली. अमेरिकेत गेल्यानंतर सोमीने प्रथम आपला अभ्यास पूर्ण केला. कारण, सलमान खानच्या प्रेमात पडल्यानंतर, जेव्हा ती मुंबईला आली तेव्हा ते अवघ्या 9व्या इयत्तेत शिकत होती. सद्य घडीला ती अमेरिकेत आपल्या कुटूंबियांसह राहते आणि स्वत:ची स्वयंसेवी संस्था चालवते.

(Somy Ali return to America after breakup with salman khan know the reason)

हेही वाचा :

तब्बल 18 महिन्यांनंतर झाले मौसमी चटर्जींच्या मुलीच्या अस्थींचे विसर्जन, जावयाने सांगितले कारण!

Neena Gupta : ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा, सुभाष घईंनी अंतर्वस्त्र बदलण्यास सांगितली, नीना गुप्तांचा दावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.