माझं मन होत नाही… लग्नाच्या दोन महिन्यातच सोनाक्षी सिन्हाने घेतला मोठा निर्णय; आता…

लग्नाला अवघे दोन महिने झाल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मोठा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी या दोन महिन्यात दोनदा हनीमूनला जाऊन आली. त्यानंतर तिने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

माझं मन होत नाही... लग्नाच्या दोन महिन्यातच सोनाक्षी सिन्हाने घेतला मोठा निर्णय; आता...
Sonakshi SinhaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 6:33 PM

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला दोन महिने झाले आहेत. या दोघांचंही लग्न अत्यंत थाटामाटत पार पडलं. सोनाक्षीने तिच्या 4200 स्क्वेअर फुटाच्या आलिशान घराच्या बाल्कनीतच नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. दोघांचाही धर्म वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी हा मध्यम मार्ग निवडला होता. तिच्या लग्नाच्यावेळी सिनेमात घडावा तसा ड्रामा घडला होता. या लग्नावर सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा खूश नसल्याचं सांगितलं जात होतं. नंतर तिचा एक भाऊ लग्नावर समाधानी नसल्याचं समोल आलं. मात्र, तरीही या आलिशान घरात हा विवाह सोहळा पार पडला. पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर सोनाक्षीने तिचं हे घर विकलं आहे.

सोनाक्षीला या घरापासून वेगळं व्हायचं नव्हतं. मग अशावेळी लग्नाच्या दोन महिन्यानंतर तिने हे घर विकण्याचा निर्णय का घेतला? तिला घर विकण्याची वेळ का आली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं कारणही समोर आलं आहे. लग्नानंतर सोनाक्षी एकदा नव्हे दोनदा हनीमूनला जाऊन आली आहे. या जोडीचे रोमांटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहे. काही फोटो तर तिच्या घरातील आहेत. या फोटोत तिचं घर अत्यंत सुंदर दिसत आहे. सोनाक्षीने स्वत: आपल्या हाताने हे घर डिझाईन केलंय. असं असताना तिने हे घर का विकण्याचा निर्णय घेतला? असा सवाल केला जात आहे.

11 कोटीला घेतलं, 25 कोटीला विकलं

सोनाक्षीने एक वर्षापूर्वीच मुंबईत 11 कोटीला हे घर विकत घेतलं होतं. माझं स्वत:चं घर असावं हे माझं स्वप्न होतं, असं ती हे घर दाखवताना म्हणाली होती. पण आता सोनाक्षीने हे घर 25 कोटीला विकल्याची बातमी आहे. 4200 स्क्वेअर फुटाच्या या घरातून समुद्राचा व्ह्यू दिसतो. आपलं हे चार बीएचकेचं घर दीड बीएचकेमध्ये रुपांतरीत केल्याचं तिने म्हटल होतं. कारण तिला स्वत:साठी एक बेडरूम हवा होता. घर सजवताना तिने घरातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं होतं. तिने तिच्या ड्रॉइंग रुममध्ये एक मोठा टीव्ही लावला होता. मित्रांसोबत सिनेमा पाहता यावा म्हणून तिने हा टीव्ही लावला होता. तिच्या ड्रॉइंग रुममधील हीच काय तिची सर्वात आवडती गोष्ट होती. तिचा डायनिंग टेबल पूर्णपणे एका लांब लाकडाचा बनवलेला होता.

लवकरच नव्या घरात

या घरात सोनाक्षीचा सर्वात आवडता एक कोना होता. तो म्हणजे तिची बाल्कनी. या बाल्कनीतच तिने जहीर सोबत लग्न केलं होतं. बाल्कनीत आपल्याला सर्वात शांत वाटतं, असं ती एकदा म्हणाली होती. या बाल्कनीत कधीच गरमी होत नाही. नेहमी हवा सुरू असते. तिचा हा फ्लॅट 26 व्या मजल्यावर होता. जेव्हा कधी मी या बाल्कनीत येऊन बसते, तेव्हा मला या घरातून परत बाहेर जावसं वाटत नाही, असंही ती म्हणाली होती. सोनाक्षीने हे घर विकलं आहे. कारण ती लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहे. जहीर हे घर तयार करत आहे. नव्या घरात दोघांसाठी अधिक जागा असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.