Video | ‘हा’ व्यक्ती आहे सोनाक्षी सिन्हाच्या आयुष्यात खास, पाहा व्हिडीओ
सोनाक्षी सिन्हाचा Double XL हा चित्रपट 4 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमाने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. हा चित्रपट वजन जास्त असलेल्या लोकांवर आधारित आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोनाक्षी आणि हुमा कुरेशीचा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटात (Movie) सोनाक्षी आणि हुमासोबत शिखर धवन देखील दिसणार आहे, अशी एक चर्चा सुरूय. यादरम्यान आता सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ (Video) मुंबईतील आहे, सोनाक्षी या व्हिडीओमध्ये तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे.
इथे पाहा सोनाक्षी सिन्हाचा व्हिडीओ
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हाचा Double XL हा चित्रपट 4 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमाने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. हा चित्रपट वजन जास्त असलेल्या लोकांवर आधारित आहे. चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, जाड लोकांना किती समस्यांना सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता.
सोनाक्षीचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये सोनाक्षीसोबत तिचा बॉयफ्रेंड अभिनेता झहीर इकबाल दिसतोय. विशेष म्हणजे यावेळी दोघांनीही कॅमेऱ्याकडे पाहून सुंदर पोज दिल्या. मुंबईतील बांद्रा परिसरात सोनाक्षी आणि झहीर दिसले. सोनाक्षी आणि झहीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सोनाक्षीचा लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.