Sonam Kapoor: ‘तुम्हाला कपडे मिळत नाही का?’; मॅटर्निटी फोटोशूटमधील बोल्ड अंदाजामुळे सोनम कपूर सोशल मीडियावर ट्रोल

'वोग' या प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी सोनमने हे फोटोशूट केलं होतं. त्याचाच फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. मात्र सोनमचं बोल्ड फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं नाही. या फोटोशूटसोबतच सोनमने संबंधित मासिकाला मुलाखतसुद्धा दिली.

Sonam Kapoor: 'तुम्हाला कपडे मिळत नाही का?'; मॅटर्निटी फोटोशूटमधील बोल्ड अंदाजामुळे सोनम कपूर सोशल मीडियावर ट्रोल
मॅटर्निटी फोटोशूटमधील बोल्ड अंदाजामुळे सोनम कपूर सोशल मीडियावर ट्रोल Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 10:59 AM

अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) शनिवारी मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद अहुजा (Anand Ahuja) यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून नेटकऱ्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र याचदरम्यान सोनमच्या मॅटर्निटी फोटोशूटवर (maternity photoshoot) नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलंय. ‘वोग’ या प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी सोनमने हे फोटोशूट केलं होतं. त्याचाच फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. मात्र सोनमचं बोल्ड फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं नाही. या फोटोशूटसोबतच सोनमने संबंधित मासिकाला मुलाखतसुद्धा दिली. या मुलाखतीत ती गरोदर होण्याच्या निर्णयाविषयी व्यक्त झाली. “प्राधान्यक्रम बदलतात आणि मला वाटतं की मुलाला या जगात आणण्याचा निर्णय ते घेत नाहीत. तर तुम्ही त्यांना इथे आणायचं ठरवता. त्यामुळे हा एक अतिशय स्वार्थी निर्णय आहे,” असं ती म्हणाली.

सोनमने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करताच तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला. ‘तू आई झालीस याचा आनंद आहे, पण इतका बॉडी शो कशाला’, असा सवाल एका युजरने तिला केला. तर ‘जर न्यूड होण हे फॅशन असेल तर आम्हाला अशा फॅशनची गरज नाही’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने संताप व्यक्त केला. ‘सध्याच्या काळात या सेलिब्रिटींना पुरेसे कपडे मिळत नाहीत का’, असा उपरोधिक सवालही एका नेटकऱ्याने केला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by VOGUE India (@vogueindia)

सोनमने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलगा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. ’20 ऑगस्ट 2022 रोजी आमच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. सर्व डॉक्टर्स, नर्स, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे आणि आम्हाला माहीत आहे की यापुढचं आमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे’, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. सोनम आणि आनंद अहुजाने मे 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. मुंबईत हा विवाहसोहळा पार पडला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.