Sonam Kapoor | वर्षभरानंतर भारतात परतली सोनम कपूर, वडिलांना पाहताच झाली भावूक, पाहा व्हिडीओ

बॉलिवूडची फॅशन दिवा अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) कित्येक महिन्यांनंतर लंडनहून भारतात परतली आहे. सोनमचे वडील अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी मंगळवारी (12 जुलै) मुंबई विमानतळावर आपल्या लेकीचे स्वागत केले.

Sonam Kapoor | वर्षभरानंतर भारतात परतली सोनम कपूर, वडिलांना पाहताच झाली भावूक, पाहा व्हिडीओ
Anil-Sonam Kapoor
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 4:50 PM

मुंबई : बॉलिवूडची फॅशन दिवा अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) कित्येक महिन्यांनंतर लंडनहून भारतात परतली आहे. सोनमचे वडील अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी मंगळवारी (12 जुलै) मुंबई विमानतळावर आपल्या लेकीचे स्वागत केले. सोनम विमानतळावरुन बाहेर येताच वडिलांना भेटताच, त्यांना पाहून ती खूपच भावूक झाली आणि त्यांना मिठी मारून रडू लागली.

या भावूक क्षणाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हायरल फोटो पाहून काही लोक सोनम गर्भवती असल्याचा अंदाजही लावत आहेत.

नेहमीप्रमाणेच स्टायलिश अवतारात दिसले अनिल-सोनम

या चर्चित फोटो आणि व्हिडीओंमध्ये अनिल कपूर आणि सोनम दोघेही नेहमीप्रमाणे स्टायलिश अवतारात दिसत आहेत. सोनमने राखाडी आणि निळा प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. यासह त्याने निळ्या-लाल रंगाचे जॅकेट आणि मास्क देखील परिधान केला होता.

दुसरीकडे अनिल कपूर ब्लॅक हूडी टी-शर्ट, जीन्स आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये दिसले. सोनमचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून काही लोक ती गर्भवती असल्याचा अंदाजही लावत आहेत. चर्चित व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने विचारले देखील की, “सोनम गर्भवती आहे का?”

पाहा व्हिडीओ :

सोनम कपूर, पती आनंद आहूजाबरोबर लंडनमध्ये राहत होती. भारतपासून दूर राहत असलेली सोनम बऱ्याच काळानंतर लंडनहून मुंबईला परतली आहे. सोनम कपूर बहुतेकदा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगत असायची की तिला भारत देश, तिचे आईवडील आणि भावंडांची किती आठवण येते. अखेर आता सोनम लंडनहून भारतात परतली आहे.

परदेशी राहण्याचा आनंद!

सुजॉय घोषच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटाद्वारे लवकरच अभिनयात पुनरागमन करणारी सोनम कपूर-आहूजा 2018मध्ये लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. अभिनेत्री फक्त खास प्रसंगीच मुंबईत येते, पण ती आपला बहुतांश वेळ लंडनमध्येच घालवते. लंडनचे स्वातंत्र्य मला आवडते, असे म्हणत तिने भारत सोडून परदेशात स्थायिक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

अलीकडेच व्होगशी झालेल्या संभाषणात सोनम कपूर म्हणाली होती की, ‘मला इथले स्वातंत्र्य आवडते. मी स्वतःहून जेवण बनवते, घर स्वच्छ करते, किराणा समान आणते’. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार लंडनमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करूनही तिला इथे पर्यटकांसारखे वाटते. पण आनंदसारखा नवरा मिळणे हे आपले भाग्य असल्याचे ती म्हणते.

(Sonam Kapoor return to India after a year get emotional On Reuniting With Anil Kapoor)

हेही वाचा :

KL Rahul-Athiya Shetty | इंग्लंडमध्ये एकत्र नांदतायत क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी, जॅकेटने केली पोलखोल!

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.