युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या वर्णभेदावर भडकली सोनम कपूर; म्हणाली..
युद्धग्रस्त सुमी (Sumy) शहरात 700 भारतीय विद्यार्थी (Indian students) सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
(Russia Ukraine War) रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केलं. रशियाकडून युक्रेनवरील आक्रमण सुरूच आहेत. युद्धग्रस्त सुमी (Sumy) शहरात 700 भारतीय विद्यार्थी (Indian students) सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी आपले व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये पहायला मिळतंय की, त्यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखलं जात आहे. स्थानिक दुकानांमध्येही त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागतोय. यासंदर्भातील वृत्तावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री सोनम कपूरने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोनमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये यासंदर्भातील वृत्त शेअर केलं आहे. भारतीय विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या वर्णभेदावर तिने राग व्यक्त केला आहे.
“रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार विनंती करूनही सुमी या पूर्व युक्रेनियन शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार झाला नाही, याबद्दल भारताने “खूप चिंतित” आहे. सुमीमधील 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अजूनही सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत”, असं वृत्त सोनमने शेअर केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना तिने लिहिलं, ‘भारतीयांना या लढाईच्या दोन्ही बाजूंनी वर्णद्वेषाचा सामना करावा लागत आहे. कृष्णवर्णीयांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ते घृणास्पद आहे. बातम्यांमध्ये तरी हेच पहायला मिळतंय.’
युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियन सैन्य सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असल्याची ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी चर्चेदरम्यान दिली. सुमी शहरातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याची विनंती केली. युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या 17 लाखांहून अधिक झाली असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेनं म्हटलं आहे.
हेही वाचा:
भारतीय सैन्यात दाखल होणार होता, आता युक्रेनकडून रशियाविरुद्ध लढतोय ‘हा’ तरूण