Sonam Kapoor: सोनम कपूर झाली आई? रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

मार्च महिन्यात सोनमने बेबी बंपसह फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर तिने बेबी शॉवरचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. आता व्हायरल फोटोवरून सोनमने बाळाला जन्म दिल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

Sonam Kapoor: सोनम कपूर झाली आई? रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण
सोनम कपूर झाली आई? रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 12:30 PM

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. तिच्या गरोदरपणाचा (Pregnancy) हा शेवटचा महिना आहे. आता बाळाच्या (Baby Birth) आगमनाची गोड बातमी लवकरच मिळणार आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सोनम हॉस्पिटलच्या बेडवर नवजात बाळाला मिठीत घेतल्याचं पहायला मिळत आहे. तर बाळाच्या जन्माचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा फोटो खरा आहे की काय, सोनमने बाळाला जन्म दिला की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मार्च महिन्यात सोनमने बेबी बंपसह फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर तिने बेबी शॉवरचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. आता व्हायरल फोटोवरून सोनमने बाळाला जन्म दिल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

व्हायरल फोटोमागील सत्य

बाळासोबतच्या सोनमच्या फोटोवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आहेत. मात्र हा फोटो खरा आहे की खोटा त्याबद्दल जाणून घेऊयात. वास्तविक सोनमने अद्याप बाळाला जन्म दिला नाही. बाळासोबतचा सोनमचा हा फोटो खोटा आहे. तिचा हा फोटो एडिट करण्यात आला आहे. सोनमच्या फोटोत बाळाचा फोटो एडिट करण्यात आला आहे. मात्र या फोटोत काही तथ्य नाही.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

सोनम ही अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांची मोठी मुलगी आहे. सोनम आणि आनंद अहुजा यांनी मे 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अनेकदा सोनमच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. मात्र सोनमने त्या नाकारल्या होत्या. गेल्या वर्षी जुलै महिन्यातही तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. त्यानंतर सोनमने व्हिडीओ पोस्ट करत त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. लग्नानंतर सोनम पतीसोबत लंडनला राहायला गेली. कामानिमित्त किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती मुंबईला येते. लंडनमध्येच तिचा बेबी शॉवर पार पडला.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आनंद आहुजासोबत लग्न झाल्यापासून बॉलिवूड इंडस्ट्रीत कमी सक्रिय आहे. 2020 मध्ये आलेला तिचा ‘AK Vs AK’ हा चित्रपट फ्लॉप ठरला. तिचा ‘ब्लाइंड’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पूरब कोहली आणि विनय पाठक महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रसूतीनंतर सोनम कपूर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.