Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Alia Wedding: लेकीच्या लग्नानंतर आई सोनी राजदान यांची भावूक पोस्ट; ‘ते म्हणतात की तुम्ही मुलीला..’

लेकीचं लग्न हा कोणत्याची आई-वडिलांसाठी अत्यंत भावूक क्षण असतो. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकताच आई सोनी राजदान (Soni Razdan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

Ranbir Alia Wedding: लेकीच्या लग्नानंतर आई सोनी राजदान यांची भावूक पोस्ट; 'ते म्हणतात की तुम्ही मुलीला..'
Soni Razdan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:47 AM

लेकीचं लग्न हा कोणत्याची आई-वडिलांसाठी अत्यंत भावूक क्षण असतो. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकताच आई सोनी राजदान (Soni Razdan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. आलियाने अभिनेता रणबीर कपूरशी (Ranbir Kapoor) गुरुवारी (14 एप्रिल) लग्नगाठ बांधली. रणबीरच्या मुंबईतल्या ‘वास्तू’ या बंगल्यात हा लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळ्यातील रणबीर आणि आलियाचा फोटो पोस्ट करत सोनी यांनी ही पोस्ट लिहिली आहे. आई म्हणून त्यांच्या काय भावना आहेत, त्या त्यांनी या पोस्टमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची ओळख अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. आलियाने रणबीर आपल्याला फार आधीपासून आवडत होता हे जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं सूत जुळलं.

‘ते म्हणतात की जेव्हा तुम्हाला मुलगा (जावई) भेटतो तेव्हा तुम्ही मुलीला गमावता. मी म्हणेन की आम्हाला अत्यंत चांगला मुलगा आणि त्यासोबत एक प्रेमळ कुटुंब भेटलंय. माझी लाडकी सुंदर लेक नेहमीच इथे आमच्यासोबत असेल. रणबीर आणि आलिया.. तुम्हाला तुमच्या या प्रवासात खूप प्रेम आणि आनंद मिळो. तुमची प्रेमळ.. माँ’, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

आलियाच्या आईची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

सोनी राजदान यांनी ‘राजी’ या चित्रपटात आलियाच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातही आलियाच्या लग्नाचा सीन आहे आणि त्यावेळी सोनी तिची पाठवणी करताना दिसतात. रणबीर-आलियाच्या लग्नानिमित्त या भावूक क्षणाची आठवण नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर करून दिली. रणबीर-आलियाच्या लग्नसोहळ्याला करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, मावशी, वडील महेश भट्ट, आलियाच्या बहिणी शाहिन भट्ट आणि पूजा भट्ट, आकाश आणि श्लोका अंबानी, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अयान मुखर्जी, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली अशी अनेक मंडळी उपस्थित होती.

VIDEO: लग्नानंतरच्या पार्टीमध्ये रणबीर-आलियाने ‘छैय्या-छैय्या’ गाण्यावर धरला ठेका

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने पार केला १००० भागांचा टप्पा

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.