Sonu Sood | यकृत प्रत्यारोपणासाठी सोनू सूदचे मोठे पाऊल, वाचा आता कोणाची मदत करतोय अभिनेता!
द मॅन पत्रिकेला नुकत्याच सोनू सूदने एक मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना सोनू सूद म्हणाला की, मी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींमधून जे काही पैसे कमावले आहेत, ते मी दान केले आहेत. मी कधी थेट शाळा किंवा हॉस्पिटलला पैसे देतो. बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, सोनूने सांगितले की, मी तुम्हाला एक उदाहरण देतो.
मुंबई : कोरोनामध्ये (Corona) अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल झाले. यादरम्यानच्या काळामध्ये लोकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली. इतकेच नव्हेतर कोरोनाच्या काळात रोजगार नसल्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ देखील आली. मात्र, यादरम्यान एखाद्या देवासारखा माणसांसाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला. मागेल त्याला त्याने मदत केली. त्याच्याकडे ज्यांनी कोणी मदत (Help) मागितली त्यांना रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. यामुळेच आता सोनू सूदचे नाव प्रत्येकाला जवळचेच वाटते. विशेष म्हणजे सोनूने केलेल्या मदतीचे काैतुक बॉलिवूडमध्ये देखील करण्यात आले.
सोनू सूद जाहिरातीचे पैसे करतो दान
द मॅन पत्रिकेला नुकत्याच सोनू सूदने एक मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना सोनू सूद म्हणाला की, मी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींमधून जे काही पैसे कमावले आहेत, ते मी दान केले आहेत. मी कधी थेट शाळा किंवा हॉस्पिटलला पैसे देतो. बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, सोनूने सांगितले की, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एस्टर हॉस्पिटलचे विल्सन नावाचे व्यक्ती मला नुकतेच दुबईला असताना भेटले आणि मला सांगितले की लोकांना त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी मदत करू इच्छितो. सहकार्य करा. पण मला 50 लिव्हर ट्रान्सप्लांट द्या, सुमारे 12 कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे.
अक्षय आणि सोनूची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता सोनू सूद कोरोना गेल्यानंतरही अजूनही लोकांची मदत करताना दिसतो आहे. सोनू सूद आता बाबू योगेश्वरन आणि विजय अँटनी आणि सुरेश गोपी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘थामेझारसन’ या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सोनू सूद अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातही दिसणार आहे. अक्षय आणि सोनूची ही जोडी चित्रपटामध्ये काय धमाल करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे सोनूने लोकांची मदत केली, त्यानंतर सोनूच्या फॅनमध्ये मोठी वाढ झाले आहे.