Sonu Sood Worshipped : सोनू सूदकडून नेल्लोरमध्ये  पहिला ऑक्सिजन प्लांट स्थापन, अभिनेत्याच्या फोटोची लोकांकडून पूजा!

अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) आपले वचन पूर्ण केले आहे. त्याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे पहिला ऑक्सिजन प्लांट बसवला आहे. ज्यासाठी संपूर्ण सेटअप सोनू सूदने प्रदान केला आहे. काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासत होती.

Sonu Sood Worshipped : सोनू सूदकडून नेल्लोरमध्ये  पहिला ऑक्सिजन प्लांट स्थापन, अभिनेत्याच्या फोटोची लोकांकडून पूजा!
सोनू सूद
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 4:40 PM

मुंबई : अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) आपले वचन पूर्ण केले आहे. त्याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे पहिला ऑक्सिजन प्लांट बसवला आहे. ज्यासाठी संपूर्ण सेटअप सोनू सूदने प्रदान केला आहे. काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासत होती. सिलिंडरमधून बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला होता आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता (Sonu Sood Worshipped installed first oxygen plant in Nellore).

नेल्लोरमधील ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडर्सनी भरलेल्या ट्रक दिसताच तेथील लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या ट्रकवर सोनू सूदचा फोटो होता आणि लोकांनी ट्रक येताना फटाक्यांची आतिषबाजी केली. सोनू सूदच्या फोटोची देवाप्रमाणे पूजा केली. सोनू सूद फाउंडेशनचा फोटो लावून लोक आणि डॉक्टरांनी सोनूचे आभार मानले.

रस्त्यावर उतरले लोक

सोनू सूदच्या सन्मानार्थ तेथील तरुणांनी दुचाकी रॅलीही काढली. ज्यामध्ये त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. लोक रस्त्यावर उतरले आणि सोनू सूद यांचे जयजयकार करण्याबरोबरच देशभक्तीच्या घोषणाही दिल्या. हा व्हिडीओ सोनूने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोनू सूदची जनसेवा

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर सोनू सूद याने ऑक्सिजन देण्याची घोषणाही केली होती. त्याने कोरोनाची औषधे देखील दिली होती. सोनूने शक्य तितक्या लोकांना मदत केली. गेल्या वर्षी कोरोनापासून सोनू सूदने स्वत:ला लोकांच्या सेवेत पूर्णपणे झोकून दिले होते. त्याच्यामार्फत करण्यात आलेल्या सेवेच्या कामाची केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चर्चा होत आहे. जगभरातील मीडिया सोनूच्या मुलाखतीसाठी रांगेत लागल्या आहेत.

दररोज भरतो जनता दरबार

आपापल्या तक्रारी घेऊन दररोज शेकडो लोक सोनूच्या मुंबईतील घराबाहेर पोहोचू लागले आहेत. सोनू आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून, दररोज लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलतो आणि मनापासून त्याची सेवा करण्यास तयार असतो. या कारणास्तव, आता देशभरातील लोकांनी सोनूला ‘मसीहा’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे. सोनूने आपली बहुतेक आश्वासने पूर्ण केली आहेत. यामुळे त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

(Sonu Sood Worshipped installed first oxygen plant in Nellore)

हेही वाचा :

Chura Ke Dil Mera 2.0 : शिल्पा शेट्टीच्या नृत्याने पुन्हा एकदा जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘चुरा के दिल मेरा’च्या नव्या व्हर्जनवर लाईक्सचा पाऊस!

Drugs Case | ‘बिग बॉस’ फेम एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अटक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.