Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samrat Prithviraj: ‘सम्राट पृथ्वीराज’ची कमाई कमी का? सोनू सूद म्हणतो..

'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट 3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अक्षय हा सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारतोय. तर मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सोनू सूदसोबतच संजय दत्तचीही यात भूमिका आहे.

Samrat Prithviraj: 'सम्राट पृथ्वीराज'ची कमाई कमी का? सोनू सूद म्हणतो..
Sonu Sood and Akshay Kumar in Samrat Prithviraj Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 2:13 PM

अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा बहुचर्चित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) राजकवी चांद बरदाईची भूमिका साकारली. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 39.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या बिग बजेट चित्रपटाकडून बरीच अपेक्षा होती. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. या कमाईविषयी (box office collection) सोनू सूदने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी व्यक्त झाला. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट 3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अक्षय हा सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारतोय. तर मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सोनू सूदसोबतच संजय दत्तचीही यात भूमिका आहे.

काय म्हणाला सोनू सूद?

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. मला यात खूप चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि प्रेक्षकांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. जितकं अपेक्षित होतं, तितकी कमाई झाली नसली तरी आपल्याला एका गोष्टीचा स्वीकार करावा लागेल की कोरोना महामारीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाने जेवढी कमाई केली, त्यात मी खूश आहे.”

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूद लवकरच त्याच्या एका नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. या प्रोजेक्टवर तो गेल्या काही दिवसांपासून खूप मेहनत करत आहे. “मी तुम्हाला सांगेन की तुम्हा सर्वांना अभिमान वाटावा, भारताला अभिमान वाटावा असा हा आणखी एक प्रयत्न आहे. मला आशा आहे की मी तुमच्यासोबत जे शेअर करेन ते तुम्हा सर्वांना आवडेल आणि त्यासाठी तुम्ही मला पाठिंबा द्याल,” असं त्याने सांगितलं.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.