Sooraj Pancholi | सूरज पांचोलीच्या कुटुंबियांकडून मिठाईचे वाटप, व्हिडीओ पाहून लोकांचा संताप, थेट म्हणाले…

सूरज पांचोली याला तब्बल दहा वर्षांनंतर कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे सूरज पांचोली याचे कुटुंबिय अत्यंत आनंदामध्ये आहेत. सूरज पांचोली याने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपला आनंद जाहिर केले आहे.

Sooraj Pancholi | सूरज पांचोलीच्या कुटुंबियांकडून मिठाईचे वाटप, व्हिडीओ पाहून लोकांचा संताप, थेट म्हणाले...
Sooraj Pancholi, Jiah Khan
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 7:30 PM

मुंबई : आज कोर्टाने अत्यंत मोठा निर्णय देत जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याची निर्दोष सुटका केलीये. सूरज पांचोली हा बाॅलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. जिया खान मृत्यू प्रकरणात कोर्टाने हा निकाल तब्बल दहा वर्षांनी दिलाय. निर्दोष मुक्तता होताच सूरज पांचोली याने सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर करत आपला आनंद जाहिर केलाय. जिया खान (Jiah Khan) हिची आई मात्र,कोर्टाच्या निर्णयानंतर दु:खी झालीये. मी अजूनही लढाई लढणार असल्याची जिया खान हिच्या आईने स्पष्ट केले आहे. सूरज पांचोली याच्यावर जिया खान हिच्या आईने गंभीर आरोप केले आहेत.

3 जून 2013 रोजी जिया खान हिचा मृत्यू झाला. मात्र, जिया खान हिच्या आईने थेट हा मृत्यू किंवा आत्महत्या नसून माझ्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा दावा केला. हे प्रकरण तब्बल दहा वर्ष कोर्टामध्ये सुरू होते. शेवटी आता कोर्टाने मोठा निर्णय देत सूरज पांचोली याची निर्दोष सुटका केलीये. निर्दोष सुटका सूरज पांचोली याची झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावताना दिसत नाहीये.

सूरज पांचोली याची निर्दोष सुटका झाल्यानंतर अभिनेत्री आणि त्याची आई जरीना वहाबने खुशी जाहिर केलीये. सूरज पांचोली याचे कुटुंबिय जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. सूरज पांचोली याच्या कुटुंबाकडून सर्वांना मिठाईचे वाटप केले जात आहे. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सूरज पांचोली याची निर्दोष सुटका कुटुंबियांनी मिठाईचे वाटप केले. आता हे लोकांना अजिबात आवडले नसल्याचे दिसत आहे. मिठाई वाटपचे फोटोवर आणि व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी पांचोली कुटुंबियांचा चांगलाच समाचार घेतलाय. एकाने कमेंट करत म्हटले की, तुमच्या मुलाने काही खूप जास्त चांगले काम केलेले नाही, जे तुम्ही इतका आनंद व्यक्त करत आहेत.

जरीना वहाबने सत्यमेंव जयते म्हटले आहे. पुढे जरीना वहाबने म्हटले की, माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर नेहमीच विश्वास आहे. माझ्या मुलासाठी ही दहा वर्षे यातना, आघात सहन केले आहेत. शेवटी तो सामान्य जीवन जगू शकतो, पण त्याने गमावलेली दहा वर्षे त्याला कोण परत देणार? हा देखील मोठा प्रश्न जरीना वहाबने उपस्थित केलाय.

केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.