जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीच्या आईचे मोठे विधान, हे सर्व फक्त…
सीबीआयने जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल तपास केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. इतकेच नाही तर तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
मुंबई : अभिनेत्री जिया खानची (Jiah Khan) आई राबिया खान यांनी जियाच्या आत्महत्येची स्वतंत्र चौकशी करण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावलीये. सीबीआयने जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल तपास केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोंदवले आहे. इतकेच नाही तर तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, जिया खानची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केलीये. मात्र, राबिया खानने (Rabia Khan) थेट सीबीआयच्या तपासावरच संशय व्यक्त केलाय.
जिया खान आत्महत्येप्रकरणी आता जरीना वहाब म्हणजेच सूरज पांचोलीच्या आईने मोठे विधान केले आहे. इतकेच नाही तर जरीना वहाबने माझा मुलगा सूरज पांचोली निर्दोष असल्याचेही म्हटले आहे. राबिया खान यांना काय खरे आहे, ते सर्व काही माहिती आहे. माझा मुलगा निर्दोष आहे. सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे.
राबिया खानच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत…त्यांनी त्यांची मुलगी गमावली आहे. मात्र, यामधून त्यांनी आता बाहेर येण्याची गरज आहे. हे सर्व काही गेल्या 9 वर्षांपासून सुरू आहे. जरीना वहाब पुढे म्हणाल्या की, माझा मुलगा निर्दोष असूनही तो गेल्या 9 वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. देवाने त्यांना आणि आम्हाला शक्ती द्यावी.
माझ्यासोबतही हे सर्व झाले असते तर मलाही खूप वाईट वाटले असते. परंतू प्रत्येकाला समजले पाहिजे की काय चुकीचे आहे आणि काय बरोबर आहे. यासर्व प्रकरणी बोलताना सूरज पांचोली म्हणाला की, मी गेल्या 10 वर्षांपासून माझ्यावर होणारे आरोप सहन करतोय हे सर्व आरोपही खोटे आहेत. मी गेल्या काही वर्षांपासून कसे आयुष्य जगतोय हे मलाच माहितीये.