मुंबई : देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief Of Defense Staff) किंवा संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत (Gen Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर अपघातात (helicopter crash) निधन झालं. याआधीही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi), काँग्रेस नेते माधवराव शिंदे (Madhavrao Shinde), आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी (YSR Reddy) यांच्यासह अनेक दिग्गज नेते हवाई दुर्घटनांना बळी पडले आहेत. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता.
कोण होत्या सौंदर्या?
अभिनेत्री सौंदर्या यांची भूमिका असलेला सूर्यवंशम (Sooryavansham) सिनेमा माहित नाही, असा भारतात एकही चित्रपट रसिक नसेल. हिरा ठाकूरच्या प्रेमात पडलेल्या राधाची भूमिका त्यांनी साकारली होती. या सिनेमाची पारायणं अनेक जणांनी केली आहेत. त्यामुळे सौंदर्या यांच्या ‘सौंदर्य’, अदाकारी आणि अभिनयाच्या प्रेमात अनेक जण होते, किंबहुना आजही असतील.
नेमकं काय घडलं होतं?
चार्टर्ड विमानाच्या अपघातात सौंदर्या यांना प्राण गमवावे लागले होते. 17 एप्रिल 2004 चा तो दिवस. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सौंदर्या भाजप आणि तेलुगू देसम पक्षाच्या प्रचारासाठी बंगळुरुला चालल्या होत्या. 100 फूट उंचीवर गेलेलं त्यांचं चार्टर्ड विमान खराब हवामानामुळे कोसळलं आणि पेटलं.
साडी पेटली, जीव वाचवण्यासाठी आकांत
भयावह गोष्ट तर यापुढे आहे. प्रत्यक्षदर्शी सांगतात, की विमान कोसळल्यानंतर सौंदर्या धावत बाहेर आल्या होत्या. तेव्हा त्यांची साडी पेटली होती. ‘जीव वाचवा’ म्हणून त्या गयावया करत होत्या, पण दुर्दैवाने त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. या अपघातात सौंदर्यासह चौघा जणांचा मृत्यू झाला होता. जगाचा निरोप घेताना त्या अवघ्या 31 वर्षांच्या होत्या. पोटात 5 महिन्यांचा जीव वाढवत होत्या.
संबंधित बातम्या :
CDS : जनरल रावत यांची जागा कोण घेणार? नवे सीडीएस म्हणून मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आघाडीवर
Rip cds bipin rawat : बिपीन रावतांना अनेक देशातून श्रद्धांजली, रशिया, इस्त्राईल, पाकिस्तान म्हणाला…