गेल्या काही काळापासून साऊथचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत. मात्र, साऊथच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
बाॅलिवूडचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे.
पठाण चित्रपटाच्या अगोदर साऊथचा अखंडा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यास तयार आहे. हा चित्रपट 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे याचा फटका पठाण चित्रपटाला बसण्याची दाट शक्यता आहे.
नुकताच अखंडा या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झालाय. हा ट्रेलर प्रेक्षकांना देखील आवडला आहे. अखंडा हा अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या ट्रेलरमध्ये नंदमुरी बालकृष्ण हे जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत.
2021 मध्ये अखंडा हा चित्रपट तेलुगुमध्ये रिलीज झाला होता. आता निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करू शकतो.