SP Balasubrahmanyam Birth Anniversary | इंजिनीअरऐवजी संगीतकार बनले, वाचा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नाव कोरणाऱ्या एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा प्रवास!

कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले.

SP Balasubrahmanyam Birth Anniversary | इंजिनीअरऐवजी संगीतकार बनले, वाचा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नाव कोरणाऱ्या एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा प्रवास!
एस. पी. बालासुब्रमण्यम
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 10:58 AM

मुंबई : कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खान पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. तरुण असलेला सलमान आणि एस.पीं.चा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एस.पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली (SP Balasubrahmanyam Birth Anniversary special story Guinness book of world record).

4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेशातल्या, नेल्लोर येथील मूलपेट मेहुआमध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिकथा कलाकार होते. हरिकथा हा आंध्र प्रदेशातील एक पारंपरिक कला प्रकार असून, यात कथा, कविता, नृत्य, नाटक अशा सगळ्या कला यात अंतर्भूत असतात. धार्मिक कथा या कलाप्रकारातून सादर केल्या जातात. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे वडील याच नाटकांतून काम करायचे.

बनायचे होते अभियंता, पण…

एस. पी. बालासुब्रमण्यम यांना अभियंता बनायचे होते, ते त्यांचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशच्या अनंतपुर येथील जवाहरलाल टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीमध्ये प्रवेश देखील घेतला होता. मात्र याच कालावधीत ते प्रचंड आजारी पडले. आजार तसा गंभीर नव्हता. परंतु त्यातून बरे होण्यासाठी त्यांना खूप कालावधी गेला. याचमुळे त्यांना इंजिनिअरिंग सोडावी लागली.

संगीत शिक्षण मात्र सुरूच!

इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी आणि इतर अभ्यासक्रम शिकत असताना त्यांचे संगीत शिक्षण मात्र नित्य नियमाने सुरु होते. 1964मध्ये त्यांना ‘हौशी’ गायक म्हणून त्यांना एका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. यानंतर गायन क्षेत्रात करिअर करायचे, असे ठरवून ते पुढे जात राहिले. सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दक्षिणात्य संगीतकार आणि गायकांसोबत सहायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली (SP Balasubrahmanyam Birth Anniversary special story Guinness book of world record).

दक्षिणेतील ‘रफी’

याच दरम्यान त्यांनी आपल्या गायकी कलेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे त्यांना पुढच्या दोन वर्षात, 1969 मध्ये म्हणजेच वयाच्या 20व्या वर्षी स्वतंत्र्यपणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचे पहिले गाणे हे त्यांच्या मातृभाषेत अर्थात तेलुगुत होते. या गाण्याच्या अगदी आठ दिवसांनी त्यांनी कन्नड भाषेतील एक गाणे रेकॉर्ड केले. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना ‘दक्षिणेतील रफी’ म्हणून नावाजले जाते.

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये कोरले नाव

देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने एस. पी. बालासुब्रमण्यम यांना गौरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. 8 फेब्रुवारी, 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 अशा बारा तासांत तब्बल 21 कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत 19 तमिळ गाणी तर, 16 हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की, दिवसाला 15-16 गाणी ते रेकॉर्ड करतच! याशिवाय ते मोठ्या कलाकारांसाठी डबिंगही करत.

(SP Balasubrahmanyam Birth Anniversary special story Guinness book of world record)

हेही वाचा :

Video | कॅन्सरशी झुंज देणाऱ्या किरण खेर यांनी मानले चाहत्यांचे आभार, लेकालाही दिला ‘हा’ खास सल्ला!

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, नोकरांपाठोपाठ बॉडीगार्डही साक्षीदार होणार

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.