Hrithik Roshan | ऋतिक रोशन याच्या वाढदिवसानिमित्त सबा आझाद हिने खास पोस्ट शेअर करत म्हटले…
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत लग्न करणार आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याचा आज ४९ वा वाढदिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. ऋतिक हा सबा आझाद हिला डेट करतोय. इतकेच नाहीतर सबा आणि ऋतिक लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे. अनेकदा विदेशामध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी ऋतिक आणि सबा जातात. न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी ऋतिक रोशन हा सबा आझाद आणि आपल्या दोन्ही मुलांसोबत गेला होता. ऋतिक त्याच्या सोशल मीडियावर कायमच सबाचे फोटो देखील शेअर करतो. विशेष म्हणजे आज ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त त्याची एक्स वाईफ सुझेन खान आणि गर्लफ्रेंड सबा आझाद हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत लग्न करणार आहे. मात्र, अजूनही सबा किंवा ऋतिक यांनी काही भाष्य केले नाहीये. आज ऋतिक रोशनचा वाढदिवस असल्याने सबाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये.
View this post on Instagram
सुझेन खान हिने ऋतिक रोशनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केलाय. सुझेन हिने लिहिले की, हॅप्पी बर्थडे Rye…तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगला आणि मजबूत पार्ट तुझी वाट पाहत आहे…देव तुम्हाला आशीर्वाद देईल…
सबा आझाने हिने देखील ऋतिक रोशनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो यापूर्वी कधीही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले नव्हते. या फोटोसोबतच सबा हिने एक मोठा मेसेज ऋतिक रोशन याच्यासाठी लिहिला आहे.
आज ऋतिक रोशन याचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता सबा आणि सुझेन यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सबा आणि ऋतिकची जोडी अनेकांना आवडत नाही.