Rhea Chakraborty | मध्यरात्री झाली या व्यक्तीच्या घराबाहेर स्पॉट रिया चक्रवर्ती, अभिनेत्री दुसऱ्यांदा पडली प्रेमात?

गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती ही सतत चर्चेत आहे. एक चर्चा आहे की, रिया ही बंटी सजदेह याला डेट करत आहे. अनेकदा हे पार्टीमध्येही स्पाॅट होतात. यावरून सुशांत सिंह राजपूत याचे चाहते रिया चक्रवर्ती हिला ट्रोल करतात.

Rhea Chakraborty | मध्यरात्री झाली या व्यक्तीच्या घराबाहेर स्पॉट रिया चक्रवर्ती, अभिनेत्री दुसऱ्यांदा पडली प्रेमात?
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:04 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही चर्चेत आली. यादरम्यान रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी रियावर अनेक आरोप केले. इतकेच नाहीतर रिया चक्रवर्ती हिला जेलमध्येही काही दिवस राहण्याची वेळ आली. अजूनही सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे चाहते रिया चक्रवर्ती हिला अनेकदा टार्गेट करताना दिसतात. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांचा दावा आहे की, रिया चक्रवर्ती हिने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. काही दिवस सतत सोशल मीडियावर (Social media) रिया चक्रवर्ती हिला ट्रोलही केले जात होते.

यादरम्यानच्या काळात बाॅलिवूडमधील अनेकजण हे रिया चक्रवर्ती हिच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगत आहे की, रिया चक्रवर्ती ही बंटी सजदेह याला डेट करत आहे. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिया चक्रवर्ती हिने आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहेत.

नुकताच रिया चक्रवर्ती हिला बंटी सजदेह याच्या घराबाहेर स्पाॅट केले गेले. विशेष म्हणजे यावेळी रिया चक्रवर्ती ही मध्यरात्री बंटी सजदेह याच्या घराबाहेर पडताना दिसली. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालीये. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. रिया पुन्हा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.

रिया चक्रवर्ती हिचा बंटी सजदेहच्या घरातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ पाहून सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांनी परत एकदा रिया चक्रवर्ती हिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये. अनेकांनी लिहिले की, हिला आता दुसरा बकरा मिळाला आहे. एका युजर्सने लिहिले की, या मुलीला अजिबात लाज नाहीये…

दुसऱ्या युजर्सने लिहिले की, तू सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असे कसे वागू शकते. बंटी सजदेह आणि रिया चक्रवर्ती हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. मात्र, यावर अजून काही भाष्य रिया चक्रवर्ती किंवा बंटी सजदेह यांनी केले नाहीये. सोहेल खान याची एक्स पत्नी सीमा सचदेह हिचा भाऊ हा बंटी सचदेह आहे. यापूर्वी यांना एका पार्टीमध्येही स्पाॅट केले गेले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.