RRR Movie | भव्य सेट, आगीचे लोट, शेकडोंची गर्दी, ट्रेलरपूर्वी एस.एस.राजामौलींनी दाखवली ‘RRR’ चित्रपटाची झलक!

बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर ‘बाहुबली’ दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांनी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आरआरआर’चा (RRR) मेकिंग व्हिडीओ रिलीज केला आहे. या मेकिंग व्हिडीओमध्ये भव्य सेट, आगीचे लोट आणि काम करणारे शेकडो लोक दिसत आहेत.

RRR Movie | भव्य सेट, आगीचे लोट, शेकडोंची गर्दी, ट्रेलरपूर्वी एस.एस.राजामौलींनी दाखवली ‘RRR’ चित्रपटाची झलक!
आरआरआर
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 1:09 PM

मुंबई : बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर ‘बाहुबली’ दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांनी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आरआरआर’चा (RRR) मेकिंग व्हिडीओ रिलीज केला आहे. या मेकिंग व्हिडीओमध्ये भव्य सेट, आगीचे लोट आणि काम करणारे शेकडो लोक दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की, राजामौली चित्रपटाशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत. राजामौली या चित्रपटावर खूप मेहनत घेताना दिसत असून, व्हिडीओ बाहुबलीची आठवण करुन देणारा आहे. चित्रपटाविषयी बोलायचे तर, याची कथा प्रत्येकाला देशभक्तीच्या रंगात रंगवण्यासाठी पुरेशी आहे. राम चरण, जूनियर एनटीआर, अजय देवगन आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक स्टार या चित्रपटात दिसणार आहेत.

पाहा व्हिडीओ :

चित्रपटाचे लेखक केव्ही विजेंद्र प्रसाद यांनी पिंकविलाशी बोलताना सांगितले की, ‘तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक प्रकारचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहिले असतील, पण तुमचे डोळे विस्फारतील असे अ‍ॅक्शन सीन्स तुम्ही पाहिले आहेत का? अशीच दृश्ये या चित्रपटात दिसतील.’  माध्यमांच्या अहवालांनुसार चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भातील अटकळ आता थांबली आहे. यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने हा चित्रपट निर्धारित वेळेत प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी केली आहे.

आणखी एक मोठी घोषणा

निर्मात्यांनी अलीकडेच एक मोठी घोषणा केली गेली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर डिजिटल रिलीजही होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या डिजिटल भागीदारांची घोषणा केली आहे, असे व्यापार विश्लेषक तराण आदर्श यांनी ट्विट केले होते. तराण अर्दश यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘झी 5 तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर आहेत. याशिवाय नेटफ्लिक्स हिंदीही आहे. त्याचबरोबर, झी सिनेमा हिंदी, स्टार प्लस तेलुगु, स्टार प्लस तमिळ, एशियनेट मल्याळम, स्टार कन्नड हे सेटेलाईट भागीदार आहेत. डिजिटल प्रवाह भागीदार (परदेशी भाषांमध्ये इंग्रजी, कोरियन, तुर्की आणि स्पॅनिश) नेटफ्लिक्स आहेत.

कोट्यावधी रुपयांत विकले हक्क

पिंकविलाच्या वृत्तानुसार, आरआरआरचे निर्माते आणि वितरकांनी चित्रपटाच्या डिजिटल, उपग्रह आणि इलेक्ट्रॉनिक हक्क विक्री करारावर सही केली आहे. बातमीनुसार हिंदीतील चित्रपटाचे थियेट्रिकल रिलीज 140 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. चित्रपटाचे हक्क कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्याचे बोलले जात आहे. बातमीनुसार, झी ग्रुपला आरआरआर जाहीर झाल्यानंतर निर्मात्यांनी उपग्रह आणि डिजिटल हक्क (सर्व भाषा) 325 कोटी रुपयांना विकले आहेत.

(SS Rajamouli upcoming film RRR making Video release)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.