शाहरुख खान याच्या चित्रपटाची धमाल सुरू असतानाच, सुहाना खान भावासोबत घालवत आहे क्वालिटी टाईम
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील २०२३ मध्येच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. द आर्चीज या चित्रपटामध्ये सुहाना खान महत्वाच्या भूमिकेत आहे.
मुंबई : शाहरुख खान याच्यासाठी २०२३ हे वर्ष खास ठरले आहे. नुकताच रिलीज झालेला त्याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर (Box office) धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. चित्रपट रिलीज होऊन फक्त चार दिवस झाले आणि या चित्रपटाने जगभरातून जवळपास ४०० कोटींचे कलेक्शन बाॅक्स ऑफिसवर केले. गेल्या कित्येक वर्षांनंतर बाॅलिवूडचा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करताना दिसला. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट हे बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात होते. पठाण चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने फार काही पठाण चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. फक्त तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. २५ जानेवारी रोजी शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय.
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील २०२३ मध्येच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. द आर्चीज या चित्रपटामध्ये सुहाना खान महत्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे फक्त सुहाना खान हिच नाहीतर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा देखील याच चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
द आर्चीज या चित्रपटामध्ये सुहाना खान महत्वाच्या भूमिकेत असणार ही माहिती कळल्यापासून शाहरुख खान याची लेक चर्चेत आहे. नुकताच मुंबईमधील एका कॅफेबाहेर सुहाना खान ही स्पाॅट झालीये. यावेळी तिच्यासोबत तिचा लहाना भाऊ अबराम देखील होता.
View this post on Instagram
ब्लॅक आउटफिटमध्ये सुहानाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता. काही दिवसांपूर्वी सुहाना खान हिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले होते. सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय दिसते.
सुहाना सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बोल्ड फोटो शेअर करते. विशेष म्हणजे सुहाना खान हिची फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर जबरदस्त आहे. द आर्चीज चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तिचे फॅन देखील वाढले आहेत.
पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पाहून सुहाना खान ही इमोशनल झाली होती. सोशल मीडियावरील एक पोस्ट रिशेअर करत सुहाना खान हिने एक इमोजी शेअर केला होता.