Shamshera: ‘सुख म्हणजे..’ मालिकेतील मराठी अभिनेता रणबीरच्या ‘शमशेरा’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत

'शमशेरा' ही बॉलिवूडमधील पीरिअड ॲक्शन फिल्म आहे. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली असून करण मल्होत्रा याचा दिग्दर्शक आहे. 1800 दशकातील काल्पनिक कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.

Shamshera: 'सुख म्हणजे..' मालिकेतील मराठी अभिनेता रणबीरच्या 'शमशेरा' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत
विविध मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 9:56 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुनील गोडसे (Sunil Godse) हे लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहेत. विविध मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारे सुनील हे रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. ‘शमशेरा’ (Shamshera) हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असून यामध्ये रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये अभिनेते सुनील गोडसे यांची झलक पहायला मिळाली. सुनील यांनी ट्रेलरमधील आपला फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिलं, ‘शमशेरामधील माझी भूमिका 22 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’ त्यांच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला.

‘शमशेरा’ ही बॉलिवूडमधील पीरिअड ॲक्शन फिल्म आहे. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली असून करण मल्होत्रा याचा दिग्दर्शक आहे. 1800 दशकातील काल्पनिक कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे. शमशेरामध्ये एका डाकूची टोळीची ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यासाठी कशी लढते, त्याची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये संजय दत्त हा खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. रणबीरने 2018 मध्ये ‘संजू’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याचा कोणताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. आता तब्बल चार वर्षांनंतर तो ‘शमशेरा’मधून पुनरागमन करत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sunil Godse (@suneel.godse)

सुनील गोडसे हे मराठी मालिका आणि चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ते सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत दादासाहेब शिर्के पाटील यांची भूमिका साकारत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.