सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग (Sukhwinder Singh) आपल्या जादुई आवाजाने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये केवळ बॉलिवूडच नाही तर अनेक पंजाबी गाणीसुद्धा गायली आहेत. मात्र नुकतेच ते एका गाण्याच्या शूटिंगमुळे वादात सापडले आहेत. सुखविंदर यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. सुखविंदर हे वाराणसीच्या (Varanasi) चेत सिंह घाटावर हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) म्युझिक व्हिडिओचं शूटिंग करत होते. यावेळी ते पायात बूट घालून नाचताना दिसले. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला.
या गाण्याच्या शूटिंगदरम्यान केवळ सुखविंदर सिंगच नाही तर इतर डान्सर्सनीसुद्धा पायात बूट घातले होते. सुखविंदर आणि त्यांच्या सहकलाकारांनी ‘हनुमान चालिसा’वर पायात शूज घालून नाचणं युजर्सना आवडलं नाही. त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला, अशी टीका नेटकऱ्यांकडून होत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच सुखविंदर यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
क्या सुखविंदर जूते पहनकर गुरुद्वारा में प्रवेश कर सकता है
— Anup Tiwari (@AnupTiw40393128) March 29, 2022
सोशल मीडियावर हा वाद वाढत असताना आता सुखविंदर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “असं केल्याने जर एखाद्याची भावना कमी होत असेल तर ते आधी सिद्ध करा. भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता,” असं ते म्हणाले.
सुखविंदर सिंग यांचा ‘हनुमान चालिसा’ हा आगामी म्युझिक व्हिडिओ वाराणसीच्या अनेक घाटांवर शूट केला जात आहे. याशिवाय अनेक मंदिरांमध्येही या गाण्याचं चित्रीकरण सुरू आहे. ज्यामध्ये संकट मोचन मंदिर, नंदेश्वर घाट, चेत सिंह किल्ला आणि दशाश्वमेध घाट यांचा समावेश आहे. या म्युझिक व्हिडिओची निर्मिती प्रवीण शहा, सगुण वाघ, विरल शाह जीत वाघ आणि चिरण भुवा यांनी केली आहे. याचं दिग्दर्शन राजीव खंडेलवाल यांनी केलं आहे.
हेही वाचा:
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची धमकी; ‘एके दिवशी तुझाही पर्दाफाश होईल’
Salman Khan: “बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानने सांगितलं कारण