अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नामध्ये ही मोठी अडचण, स्वत: सुनील शेट्टी यांनी केला खुलासा
गेल्या काही वर्षांपासून अथिया ही भारतीय क्रिकेटर केएल राहुल याला डेट करत आहे. अनेकदा विदेशात केएल राहुल आणि अथियासोबत फिरताना दिसतात.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी लवकरच लग्न बंधणात अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अथिया ही भारतीय क्रिकेटर केएल राहुल याला डेट करत आहे. अनेकदा विदेशात केएल राहुल आणि अथियासोबत फिरताना दिसतात. इतकेच नाही तर अथिया केएल राहुलसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करते. अनेकदा सुनील शेट्टी देखील केएल राहुलचा मॅच बघण्यासाठी लेकीसोबत येतो. सातत्याने केएल राहुल आणि अथिया यांना लग्न कधी करणार हा प्रश्न विचारला जातोय.
नुकताच अभिनेता सुनील शेट्टी याला केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सुनील शेट्टीने अत्यंत स्पष्ट सांगितले की, केएल राहुल आणि अथियाचे लग्न लवकरच होणार आहे, मात्र, यांच्या लग्नामध्ये एक मोठी अडचण आहे.
सुनील शेट्टी म्हणाले की, दोघांचे शेड्युल पाहून आम्हाला लग्नाची तारीख ठरवावी लागणार आहे. कारण केएल राहुलचे सतत मॅच असल्याने त्याचे शेड्युल खूप बिझी असणार आहे. यामुळे आम्ही सध्या कोणती तारीख योग्य राहिल, यावर विचार करत आहोत.
अथिया आणि केएल राहुलचे लग्न कधी, कुठे आणि केंव्हा होणार हे आम्ही सर्वांना योग्य वेळी सांगणार आहोत. एक अशी चर्चा आहे की, जानेवारी महिन्यात केएल राहुल आणि अथिया लग्न करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून केएल राहुलला मॅचमध्ये काही खास कामगिरी करता येत नाहीये.
सुनील शेट्टीच्या लेकीने बाॅलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. परंतू यामध्ये तिला यश मिळाले नाही. सुनील शेट्टीच्या लेकीला काही खास जादू अभिनयाची करता आली नाहीये. अथिया आणि केएल राहुलचे लग्न कधी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.