Suniel Shetty: ‘भाऊ, तू आधी चष्मा नीट लाव’, ‘गुटखा किंग’ म्हणणाऱ्याला सुनील शेट्टींनी सुनावलं

सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी सुनावताच संबंधित नेटकऱ्याने माफी मागत तुमचा मोठा चाहता असल्याचं म्हटलं. एका होर्डिंगवरील फोटोवर त्या युजरने कमेंट केली होती.

Suniel Shetty: 'भाऊ, तू आधी चष्मा नीट लाव', 'गुटखा किंग' म्हणणाऱ्याला सुनील शेट्टींनी सुनावलं
Suniel Shetty Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 10:10 AM

तंबाखू ब्रँडच्या (Tobacco Brand) जाहिरातीवरून काही दिवसांपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेता अक्षय कुमारने संबंधित ब्रँडची जाहिरात केल्याने त्याला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अखेर त्याने जाहिरातीतून माघार घेत चाहत्यांची माफी मागितली. आता त्याच जाहिरातीसाठी एका नेटकऱ्याने अभिनेता सुनील शेट्टीला (Suniel Shetty) टॅग केलंय. मात्र यावेळी नेटकऱ्याने केलेल्या चुकीबद्दल सुनील शेट्टी यांनी त्याला चांगलंच सुनावलं. जाहिरातीत अजय देवगणऐवजी (Ajay Devgn) त्याने सुनील शेट्टी यांना टॅग करत ‘गुटखा किंग’ असं म्हटलं. सुनील शेट्टी यांनी सुनावताच संबंधित नेटकऱ्याने माफी मागत तुमचा मोठा चाहता असल्याचं म्हटलं. एका होर्डिंगवरील फोटोवर त्या युजरने कमेंट केली होती.

तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीच्या या होर्डिंगवर अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान या तिघांचा फोटो पहायला मिळत आहे. याच होर्डिंगच्या फोटोवर कमेंट करत त्या युजरने लिहिलं, ‘देशाचे गुटखा किंग- शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी.. तुमच्या मुलांना तुमची लाज वाटेल. देशाला तुम्ही चुकीचा मार्ग दाखवत आहात. भारताला कर्करोग राष्ट्र बनवू नका मूर्खांनो’. सुनील शेट्टी यांनी या पोस्टवर संबंधित युजरला सुनावत लिहिलं, ‘भावा तू तुझा चशमा नीट लाव किंवा तो बदलून तरी घे.’ यासोबतच त्यांनी हात जोडल्याचे इमोजी पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा

आपण अजय देवगणऐवजी चुकून सुनील शेट्टी यांना टॅग केल्याचं लक्षात येताच त्या युजरने माफी मागितली. ‘सुनील शेट्टीजी मला माफ करा. मी चुकून तुम्हाला टॅग केलं आणि तुम्हाला दुखावण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. मी तुमचा चाहता असल्याने माझ्या टॅग लिस्टमध्ये सर्वांत आधी तुमचंच नाव येतं. म्हणून अशी चूक झाली’, असं त्याने लिहिलं. त्यावर सुनील शेट्टी यांनीसुद्धा हात जोडल्याचा इमोजी पोस्ट करत त्याला माफ केलं.

सुनील शेट्टी हे नुकतेच ‘घनी’ या तेलुगू चित्रपटात झळकले. याशिवाय गेल्या वर्षी त्यांनी ‘मुंबई सागा’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.