जावई केएल राहुल याच्या खराब फॉर्मवर सासरे बुवा सुनील शेट्टीचे मोठे भाष्य, म्हणाले, अपयशावर

सुनील शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सुनील शेट्टी यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. ज्यामुळे ते चर्चेत आहेत. हेरा फेरी 3 चित्रपटासंदर्भात सुरू असलेल्या वादावर देखील त्यांनी मोठे भाष्य केले आहे. केएल राहुलची मुलगी अथिया हिने काही दिवसांपूर्वी क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे.

जावई केएल राहुल याच्या खराब फॉर्मवर सासरे बुवा सुनील शेट्टीचे मोठे भाष्य, म्हणाले, अपयशावर
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:53 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) हे गेल्या काही दिवसांपासून हंटर या त्यांच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे सुनील शेट्टी हे वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करतानाही दिसले. आता लवकरच हेरा फेरी 3 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला सुनील शेट्टी लवकरच येणार आहेत. काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 या चित्रपट (Movie) करण्यास अक्षय कुमार याने नकार दिला होता. मात्र, अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नसल्याचे कळताच चाहते निराश झाले आणि अचानकच अक्षय कुमार (Akshay Kumar) याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 चित्रपटाचा प्रोमो शूट करण्यात आलाय.

नुकताच सुनील शेट्टी यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी यांनी काही मोठे भाष्य केले आहे. सुनील शेट्टी यांनी जावई केएल राहुल याच्याबद्दल मोठे भाष्य केले. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच केएल राहुल याच्या करियरमधील खराब काळाबद्दल देखील सुनील शेट्टी हे बोलताना दिसले आहेत.

सुनील शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, केएल राहुल हा माझा जावई नसून तो माझा मुलगा आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी एकमेकांना तब्बल चार वर्ष डेट करून लग्न केले. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लग्न पार पडले.

सुनील शेट्टी यांना केएल राहुल याच्या अपयशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सुनील शेट्टी म्हणाले की, आम्ही अपयशाबद्दल चर्चा करत नाहीत, कारण तो एक फायटर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आम्ही त्याला (केएल राहुल) अधिक प्रेम दाखवतो. आम्ही जगातील प्रत्येक विषयावर चर्चा करतो. त्याच्या मनातील काही गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करतो.

सुनील शेट्टी पुढे म्हणाले, मुळात म्हणजे मी केएल राहुल याला क्रिकेट खेळायला नाही शिकू शकत. कारण तो देशासाठी खेळत आहे. गली क्रिकेट नाही खेळत तो…मी एका तरूण मुलाला वाईट काळातून जाताना बघितले आहे. पण तो तिथे उभा राहून ते अनुभवण्यास आणि कठोर परिश्रम करण्यास तयार आहे. दुसरे काय बोलणार फक्त बल्ला बोलेल…बाकी बोलून काहीच फायदा नाही.

हे असे चित्रपट नाहीत जिथे आपण संघ म्हणून बाहेर जाऊ शकतो. त्याला बाहेर जावे लागेल, त्या चेंडूला सामोरे जावे लागेल आणि खेळावे लागेल आणि तो ते करेल आणि तो ते करत राहील. सुनील शेट्टीने अत्यंत मोठे भाष्य केले आहे. केएल राहुल याच्या खराब काळात नेमके काय घडत होते, हे सांगताना सुनील शेट्टी दिसले आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.