“हा कसला आवाज?”; सुनील दत्त करायचे अमिताभ यांच्या आवाजाचा तिरस्कार; दिली होती मूक भूमिका
सेलिब्रेटींपीसून ते मिमिकरी आर्टिस्ट्स ज्यांचा आवाज काढण्याचा प्रयत्न करत असतात ते म्हणजे म्हणजे अमिताभ बच्चन. मात्र सुनील दत्त हे मात्र अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा तिरस्कार करत होते.
‘अँग्री यंग मॅन’ म्हणून आज ज्यांना ओळखतात, त्यांच्या उंचीपासून ते त्यांच्या अभिनयापर्यंत सगळ्याचबाबतीत ज्यांना अख्खं बॉलिवूड पसंत करतं, गुरु मानतं असे ‘बिग बी’ म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आवाजासाठीही ओळखले जातात.त्यांच्या भारदस्त आवाजाचे सगळेच दिवाने आहेत.
कित्येकांनी त्यांचे फिल्मी डायलॉग्स त्यांच्याच आवाजात बोलण्याचा प्रयत्नही केला असेल. काही लोक सेलिब्रेटींचे आवाज काढण्यात पटाईत असतात. अशा मोजक्यात मिमिकरी आर्टिस्ट्सना अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची नक्कल करता येते. पण तरी त्यांच्या आवाजात तो भारीपणा येत नाही. अमिताभ बच्चन यांच्यासारखा आवाज मिळवण्यासाठी नवाच जन्म घ्यावा लागेल, असं काही जण म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का की दिग्गज अभिनेते सुनील दत्त हे मात्र अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा तिरस्कार करत होते.
सुनील दत्त करायचे अमिताभ यांच्या आवजाचा तिरस्कार
बॉलिवूड अभिनेत्री शीबा आकाशदीप साबीर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत याबद्दल सांगितले. अभिनेते सुनील दत्त यांना अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा तिरस्कार होता. शीबा म्हणाल्या, सुनील दत्त यांना अमिताभ यांचा आवाज हा रेडिओ जॉकीसारखा वाटायचा.
सुनील दत्त यांच्या ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात अमिताभ यांचा आवाज आवडला नसल्याने त्यांना मूक भूमिका देण्यात आली होती. रेश्मा और शेरामध्ये अभिनयासोबतच सुनील दत्त यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.
अमिताभ यांचा चित्रपट निर्मात्यालाही आवडला नव्हता
शीबा यांच्या सासरच्यांनाही अमिताभ बच्चन यांचा आवाज आवडत नव्हता. शीबाचे सासरे मनमोहन साबीर यांनी अमिताभ बच्चन यांचा सात हिंदुस्तानी हा पहिला चित्रपट तयार केला होता.
शिबा यांचे सासरे एकदा म्हणाले होते, “एक नायक आमच्या घरी यायचा आणि माझ्या पायाशी बसायचा.आम्ही विचार करायचो की हा आवाज कोणत्या प्रकारचा आहे, तो प्रतिध्वनी आहे का? सुनील दत्तने देखील अमिताभ यांना एकदा सांगितले होते की त्यांना आवाज आवडत नाही.” हा किस्साही शीबा यांनी सांगितला.
सुनील दत्त यांनी अमिताभ यांना दिली होती मूक भूमिका
अमिताभ बच्चन यांनी 1969 साली ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता, पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. पहिल्या खराब सुरुवातीनंतर अमिताभ आता दुसऱ्या चित्रपटाच्या शोधात होते.
जेव्हा चित्रपट उपलब्ध नव्हते तेव्हा सुनील दत्त यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शिफारस मिळाली होती की अमिताभ बच्चन यांनाही चित्रपटात कास्ट करावे. खरं तर, इंदिरा गांधी अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन आणि सुनील दत्त यांची पत्नी नर्गिस यांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.
सुनील दत्त या अभिनेत्याला मदत करण्यास तयार झाले आणि त्यांनी अमिताभ यांना चित्रपटात कास्ट करत असल्याचे नर्गिस यांना सांगितले. सुनील दत्त यांनी बिग बींना भेटायलाही बोलावलं, पण जेव्हा त्यांचा भारदस्त आवाज ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं.
सुनील यांना पत्नीला वचन दिले होते, त्यामुळे अमिताभ यांना चित्रपटात कास्ट करावे लागले, पण त्यांच्या दमदार आवाजावर मात्र त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी या चित्रपटात अमिताभ यांना मुक्याची भूमिका देऊ केली होती.
आज आवाज अभिनेत्यापेक्षा मोठा ज्या आवाजाबद्दल त्या काळात अमिताभ यांना टीकेल सामोरं जावं लागलं होतं. आज त्याच आवाजाचे अख्खं बॉलिवूड फॅन आहे. आजच्या काळात त्यांचा आवाज अभिनेत्यापेक्षा मोठा होईल याची कदाचितच कोणी कल्पना केली नव्हती.
अमिताभ बच्चन यांचा आवाज ही त्यांची मुख्य ओळख झाली आहे. कित्येकजण त्यांच्या आवाजासारखा आवाज काढण्यासाठी धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. पण शेवटी खरं सोनचं लखलखत म्हणतात ते काही खोटं नाही. त्यानंतर नर्गिसने ही गोष्ट सुनील दत्तला सांगितली आणि बिग बींना चित्रपटात कास्ट केले.