Chup: मोबाइलमध्ये पाहू शकता सनी देओलचा ‘चुप’; जाणून घ्या कधी अन् कुठे..
सायकोथ्रिलर 'चुप'ला मिळतोय दमदार प्रतिसाद; मोबाइलमध्ये पहायचा असेल तर हे वाचा
मुंबई: काही चित्रपटांच्या प्रमोशनवर अमाप पैसा खर्च करूनसुद्धा बॉक्स ऑफिसवर त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. तर काही चित्रपटांचं प्रमोशन फारसं न करताही प्रेक्षक-समीक्षकांच्या मनावर ते राज्य करतात. सनी देओल (Sunny Deol) आणि दलकर सलमान (Dulquer Salmaan) यांचा ‘चुप’ हा चित्रपट दुसऱ्या विभागात मोडतो. या शुक्रवारी ‘चुप: रेव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ (Chup: Revenge of the Artist) हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाची चांगली कमाई झाली. तर सोशल मीडियावरही प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. या सायकोथ्रिलर क्राइम चित्रपटात दलकर सलमान आणि पूजा भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत.
आर. बाल्की यांनी ‘चुप’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असली तरी लवकरच तो ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे. ‘चुप’चे ओटीटी हक्क झी5 या प्लॅटफॉर्मने विकत घेतल्याचं कळतंय. त्यामुळे झी5 चं सबस्क्रीप्शन असलेल्यांना लवकरच हा चित्रपट मोबाईलमध्ये पाहता येणार आहे.
SUNNY DEOL – DULQUER SALMAAN: TERRIFIC ADVANCE OF ‘CHUP’… Post-pandemic, #RBalki‘s #Chup ranks amongst the top-ranking films at the advance booking counters… 1.25 lacs tickets sold already and counting!https://t.co/roVejkMno5#ChupInCinemasTomorrow #ChupRevengeOfTheArtist pic.twitter.com/nkkuWaNJAL
— taran adarsh (@taran_adarsh) September 22, 2022
‘चुप’ या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे आणि कशामुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे, हे जाणून घेण्यासाठी कमीत कमी 8 आठवड्यांची वाट पाहावी लागणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन आणि निर्मात्यांनी मिळून हा निर्णय घेतला की, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी तो ओटीटीवर प्रदर्शित करू शकतो. 1 ऑगस्ट 2022 रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सनी देओलचा हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर 23 नोव्हेंबरनंतर पाहता येईल.
‘चुप: रेव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. आर. बाल्की यांनी त्यांचा हा चित्रपट गुरुदत्त यांना समर्पित केला आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा खूप चांगली झाली. 1.25 लाखपेक्षा अधिक तिकिटं ॲडव्हान्स बुकिंमध्ये विकली गेल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली.