Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Debut | सनी देओल लवकरच ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार!

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) सध्या राजकीय कारकिर्दीबरोबरच चित्रपट कारकीर्दीवरही लक्ष केंद्रित करत आहे.

Debut | सनी देओल लवकरच 'या' वेब सीरिजमध्ये दिसणार!
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 1:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) सध्या राजकीय कारकिर्दीबरोबरच चित्रपट कारकीर्दीवरही लक्ष केंद्रित करत आहे. बातमी अशी आहे की, सनी देओल लवकरच डिजिटल प्लटफाॅर्ममध्ये पर्दापण करणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार सनी देओल जी 5 प्रोडक्शनद्वारे डिजिटल डेब्यू करणार आहे. सनी देओलने आपल्या या आगामी प्रोजेक्टची शूटिंगही सुरू केली आहे. या वेब सीरिजचे नाव ‘G49’ आहे असे सांगितले जात आहे. सनी देओल हा सध्या मुंबईतील या वेब सीरिजचे शूट देखील करत आहे. (Sunny Deol will soon be seen in the web series ‘G49’)

बॉबी देओलनंतर आता सनी देओलचे डिजिटल पदार्पण करणार आहे. बॉबी देओल बराच काळ पडद्यापासून दूर राहिला होता. मात्र, त्याने ‘आश्रम’ या वेब सीरिमधून परत एकदा पदार्पण केले आहे. चाहत्यांना ‘आश्रम’ वेब सीरिजमधील बॉबी देओलचा अभिनय प्रचंड आवडला आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या भागाला चाहत्यांकडून एवढ प्रेम मिळाले की, लवकरच या वेब सीरिजचे दुसरे सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘आश्रम’ च्या यशानंतर बॉबीला साऊथच्या चित्रपटांच्याही ऑफर येऊ लागल्या आहेत.

सन 2019 मध्ये सनी देओल ‘ब्लैंक’ चित्रपटात दिसला होता. यानंतर त्यांनी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे त्याने आपला मुलगा करण देओल लाँच केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. डिजिटल पर्दापणाबरोबरच सनी देओल 2 या चित्रपटाचीही तयारी करत आहे. या चित्रपटात कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसणार आहेत.

अनिल शर्मा दिग्दर्शित आणि दीपक मुकुट निर्मित या चित्रपटाचे शूटिंग मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. आणि पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित ‘अपने’ हा चित्रपट वर्ष 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि शिल्पा शेट्टी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय… जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!

आधी लव्ह, लव्ह, लव्ह नंतर लग्नही केलं पण मग मोडलं का? सुशील ,संस्कारी टीव्ही सुनांचं वास्तवादी आयुष्य !

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

(Sunny Deol will soon be seen in the web series ‘G49’)

'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.